Shreya Maskar
'लक्ष्मी निवास' या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता मेघन जाधव लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. मालिकेत त्याने 'जयंत' हे पात्र साकारले आहे.
मेघन जाधवने सोशल मीडियावर फोटो शेअर करून आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. मेघन लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर हिला डेट करत होता आणि आता दोघे लवकरच लग्नाच्या नात्यात बांधले जाणार आहे.
मेघन जाधवने इन्स्टाग्राम एक फोटो शेअर केला आहे. ज्यात अनुष्का आणि मेघनचा हात पाहायला मिळत आहे. दोघांच्या बोटांमध्ये अंगठी दिसत आहे. या फोटोला 'तुम हो तो…' हे गाणे लावले आहे.
मेघन आणि अनुष्काने सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये आपले आयुष्यातील क्यूट क्षणांचे फोटो शेअर केले आहे. त्या फोटोच्या कॅप्शनला त्यांनी हार्ट इमोजी दिला आहे.
मेघन आणि अनुष्काच्या फोटोंवर चाहते, कलाकार मंडळी यांच्याकडून शुभेच्छांचा, प्रेमाचा वर्षाव होत आहे. दोघांचे चाहते या बातमीमुळे खूपच खुश आहेत.
दोघांच्या बोटांमध्ये अंगठी पाहून सोशल मीडियावर यांचा साखरपुडा झाल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. मेघन आणि अनुष्का यांच्यात 9 वर्षांचा अंतर आहे. मेघनचे वय 33 आहे. तर अनुष्का 24 वर्षांची आहे.
अनुष्का पिंपुटकरने 'आई मायेचं कवच', 'रंग माझा वेगळा' या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच अनुष्का 'अल्याड पल्याड' या चित्रपटात देखील झळकली आहे.
मेघन जाधवने मराठीसोबतच हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले आहे. तो 'रंग माझा वेगळा' मध्ये देखील दिसला. त्यानंतर त्याने 'सास बिना ससुराल' या हिंदी मालिकेत काम केले आहे.