Shreya Maskar
आज (30 ऑक्टोबर 2025) बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेचा वाढदिवस आहे. अनन्या आज 27 वर्षांची झाली आहे.
अनन्या पांडे ही बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते चंकी पांडे यांची लेक आहे. तिचे इन्स्टाग्राम 26.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.
2019 ला रिलीज झालेल्या 'स्टुडंट ऑफ द इयर 2'मधून अनन्या पांडेने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात टायगर श्रॉफसोबत काम केले.
अनन्या पांडे एका चित्रपटासाठी जवळपास 3 कोटी रुपये फी घेते. तर एका जाहिरातीसाठी 50 ते 60 लाख रुपये मानधन घेते.
अनन्या पांडेचे मुंबईत वांद्रे येथे आलिशान घर आहे. तिचे हे अपार्टमेंट कोट्यवधींचे आहे.
अनन्या पांडेकडे लग्जरी कारचे कलेक्शन आहे. यात बीएमडब्ल्यू, रेंज रोव्हर आणि मर्सिडीज यांचा समावेश आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अनन्या पांडेची एकूण संपत्ती अंदाजे 74 कोटी रुपये आहे. चित्रपट, जाहिराती आणि गुंतवणुकीतून ती कमाई करते.
अनन्या पांडे आता 'तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती कार्तिक आर्यनसोबत रोमँटिक अंदाजात दिसणार आहे.