Shruti Vilas Kadam
‘वीण दोघातली ही तुटेना’ मालिकेत भव्य बीच वेडिंग दाखवले जाणार असून हा मराठी मालिकांसाठी अनोखा सोहळा ठरणार आहे.
समर-स्वानंदी आणि आधिरा-रोहन या दोन्ही जोडप्यांचा विवाह एकाच वेळी रंगणार आहे.
या विशेष भागाचे चित्रीकरण दक्षिण गोव्यातील आलिशान फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सुरू असून समुद्रकिनारी शाही सजावट करण्यात आली आहे.
समर आणि स्वानंदी यांचा हा निर्णय त्यांच्या नात्यात कोणते बदल घडवेल याची उत्सुकता चाहत्यांमध्ये शिगेला पोहोचली आहे.
फुलांनी सजवलेला मंडप, समुद्राच्या लाटांचा नजारा आणि कलाकारांचे आकर्षक पोशाख या विशेष प्रसंगाचे मुख्य आकर्षण असणार आहे.
गोव्याच्या प्रवासापूर्वी मुंबईत स्वानंदीची खास मेहंदी आणि मुहूर्तमेढ विधी मोठ्या उत्साहात पार पडला.
कलाकार आणि कथानकातील कुटुंबीय सगळेच हसतमुखाने, खेळत-गात या आनंदसोहळ्यात सहभागी झाले असून वातावरण उत्साहाने भरले आहे.