Veen Doghantali Hi Tutena saam tv
मनोरंजन बातम्या

Veen Doghantali Hi Tutena : समरसोबतची मैत्री तुटली, आनंदचा आत्महत्येचा प्रयत्न; स्वानंदी दोन जिवलग मित्रांना कसं जवळ आणणार? | VIDEO

Veen Doghantali Hi Tutena Update : 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत समर आणि आनंदच्या मैत्रीत दुरावा आल्याचे पाहायला मिळते. मल्लिका दोघांमध्ये गैरसमज निर्माण करते.

Shreya Maskar

'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे.

समर आणि आनंदच्या नात्यात दुरावा आला आहे.

आनंद आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो.

सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांच्या 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालिकेत समरने स्वानंदीचा वाढदिवस सुंदर साजरा केला. समर-स्वानंदी यांच्यात मैत्रीचे नातं खुलताना पाहायला मिळत आहे. या सर्वात मल्लिका नवीन कारस्थान करताना दिसते. ती समर आणि आनंद यांच्या मैत्रीमध्ये फूट पाडते. मल्लिका पार्टी सुरू असताना आनंदवर चोरीचा आळ घेते. ज्यामुळे घरातील वातावरण बदलते.

आनंदला चोर बोल्यामुळे निकिताला खूप वाईट वाटते. निकिताच्या पर्समध्ये हरवलेला हार सापडतो. ज्यामुळे समर आनंदवर चांगला भडकतो. कारण काही दिवसांपूर्वी मल्लिकाने समरला खोटं सांगितलेले असते की, आनंदला पैशांची अडचण आहे. घडलेला प्रकारात स्वानंदी आनंद आणि निकिताची साथ देते. मात्र समर आनंदवर अविश्वास दाखवतो, ज्यामुळे त्यांच्या मैत्रीत दुरावा येतो.

मल्लिकामुळे निर्माण झालेल्या गैरसमजामुळे आनंद आणि समरची मैत्री तुटते. आनंद आणि निकिता पार्टीतून घरी निघून येतात. समरने दाखवलेला अविश्वास आनंदच्या मनाला खूप लागतो. दुखावलेला आनंद आत्महत्या करण्याच्या प्रयत्न करतो. स्वतःला खोलीत कोंडून घेतो. निकिता स्वानंदीला फोन करून सगळे सांगते आणि घरी बोलावते. स्वानंदी आनंदला खूप समजावते आणि अखेर मैत्रीची शपथ घालते.

'वीण दोघांतली ही तुटेना' या प्रोमोवर नेटकरी कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. समर-आनंदच्या मैत्रीत आलेला हा दुरावा स्वानंदी कसा मिटवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'वीण दोघांतली ही तुटेना' ही मालिका झी मराठी वाहिनीवर संध्याकाळी 7.30 ला पाहायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिलांमध्ये वाढतोय Ovarian Cancer चा धोका, ही ५ लक्षणे अजिबात करू नका दुर्लक्षित; डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये झोपलेल्या प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या त्रिकुटाला बेड्या

Anil Parab : साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांना दिलासा; खेड न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

MPSC Bharti 2026: आनंदाची बातमी! MPSC द्वारे घेतली जाणार तलाठी भरती; १७०० जागांसाठी होणार परीक्षा

Weight Loss Tips: मलायका अरोरा म्हणते फक्त १० मिनिटांचा हा योगा करा, पोटावरची चरबी मेणासारखी वितळेल आणि वजन होईल कमी

SCROLL FOR NEXT