Varun-Pooja  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Varun-Pooja : वरुण धवन अन् पूजा हेगडे भक्तीत दंग, ऋषिकेशला दिलेल्या भेटीचे नेमकं कारण काय?

Varun Dhawan And Pooja Hegde Visit Rishikesh : वरुण धवन आणि पूजा हेगडे ऋषिकेशला पोहचले आहेत. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दोघांनी येथे गंगा आरती देखील केली.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) नेहमी त्याच्या चित्रपटांमुळे ओळखला जातो. आजवर त्याने अनेक हिट चित्रपट केले आहेत. त्याच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. सध्या वरुण धवन त्याचा आगामी चित्रपट 'है जवानी तो इश्क होना है' (Hai Jawani Toh Ishq Hona Hai) याच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात वरुण धवनसोबत अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) देखील पाहायला मिळणार आहे. चाहते या चित्रपटासाठी खूप आतुर आहेत. नुकतीच वरुण धवनने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

वरुण धवन आणि पूजा हेगडे भक्तीत दंग झालेले पाहायला मिळत आहे. वरुण आणि पूजा ऋषिकेशला पोहचले आहेत. येथे त्यांनी गंगा मातेचे आशीर्वाद घेऊन पूजा करतानाचे फोटो शेअर केले आहे. वरुण आणि पूजाच्या 'है जवानी तो इश्क होना है' चित्रपटाच्या काही भागाचे शूटिंग ऋषिकेशमध्ये (Rishikesh ) होणार आहे. त्याआधी त्यांनी हे देव दर्शन केले आहे. ऋषिकेशच्या प्रवासाला सुरूवात केली आहे. आता चित्रपटाचे शूटिंग गंगा नगरी ऋषिकेशमध्ये सुरू झाले आहे.

फोटोंमध्ये दोघेही गंगा आरती (Ganga Aarti ) करताना दिसत आहेत. या पोस्टला वरुणने हटके कॅप्शन दिले आहे. त्यांनी लिहिलं की, "ऋषिकेशमधील आमच्या शेड्यूलची चांगली सुरुवात झाली...धन्य..." त्याच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. दोघेही पारंपरिक कपड्यात पाहायला मिळाले. वरुण धवनने पांढऱ्या कुर्ता पायजमा परिधान केला होता. तर पूजाने सलवार सूट परिधान केला होता. तसेच फोटोमध्ये ती दोघे एक रोप लावताना देखील दिसत आहेत.

वरुण धवन आणि पूजा हेगडेने आश्रमातील मुलांशी संवाद देखील साधला आहे. वरुण धवन आणि पूजा हेगडेचा 'है जवानी तो इश्क होना है' चित्रपट दिग्दर्शक डेव्हिड धवन दिग्दर्शित करत आहेत. या चित्रपटात खूप तगडे कलाकार पाहायला मिळणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'है जवानी तो इश्क होना है' चित्रपट 2 ऑक्टोबर 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT