Suhana Khan : सुहाना खान चाहत्यांच्या गर्दीत अडकली, सोबत असलेल्या अगस्त्य नंदानं 'अशी' काढली वाट

Suhana Khan Viral Video: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची लेक सुहाना खानचा सोशल मिडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सुहाना खान चाहत्यांच्या गर्दीत अडकलेली पाहायला मिळत आहे. तिथे नेमकं काय घडलं, जाणून घेऊयात.
Suhana Khan Viral Video
Suhana KhanSAAM TV
Published On

बॉलिवूडच्या किंग खानची लेक सुहाना खान (Suhana Khan) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. त्याच्या बॉलिवूडमध्ये झालेल्या पदार्पणानंतर ती कायम अनेक ठिकाणी स्पॉट झाली आहे. आता ही सुहाना खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सुहानाच्या बॉलिवूडमध्ये झालेल्या पदार्पणानंतर ती अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाला डेट कर असल्याची चर्चा देखील सोशल मीडियावर चांगली रंगली आहे

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये सुहाना खान चाहत्यांच्या गर्दी अडकलेली पाहायला मिळत आहे. तर तिच्यासोबत अगस्त्य नंदाही (Agastya Nanda) दिसत आहे. याआधी देखील सुहाना आणि अगस्त्य एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यांना अनेक पार्टीत एकत्र पाहिले जाते. आता देखील सुहाना खान मित्रांबरोबर पार्टी करून वर्सोवा येथील एका कॅफेमधून बाहेर पडताना दिसली. तेव्हा पापाराझींनी तिला स्पॉट केले. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये सुहाना पापाराझी आणि चाहत्यांची गर्दीत अडकलेले पाहायला मिळत आहे.

सुहाना खानला गर्दीतून बाहेर काढण्यासाठी तिचे दोन मित्र पुढे येतात. त्यात अगस्त्य नंदा देखील असतो. तिला गर्दीतून बाहेर काढून गाडीत बसवतो. सुहाना खान आणि अगस्त्य नंदा यांच्या डेटींगची चर्चा त्यांच्या 'द आर्चीज' चित्रपटादरम्यान सुरू झाली. या दोघांनीही 'द आर्चीज' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. मात्र त्यांच्या नात्याबद्दल अद्याप कोणताही खुलासा करण्यात आला नाही आहे. आता लवकरच सुहाना खान वडिलांसोबत चित्रपटात झळकणार आहे. शाहरुख खान आणि सुहाना खानचा 'द किंग' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते शाहरुख खान आणि सुहाना खानला एकाच पडद्यावर पाहण्यासाठी खूप आतुर आहेत.

आता लवकरच सुहाना खान वडिलांसोबत चित्रपटात झळकणार आहे. शाहरुख खान आणि सुहाना खानचा 'द किंग' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते शाहरुख खान आणि सुहाना खानला एकाच पडद्यावर पाहण्यासाठी खूप आतुर आहेत.

Suhana Khan Viral Video
Jolly LLB 3 Release Date : अक्षय कुमार अन् अरशद वारसीच्या कॉमेडीचा तडका, 'जॉली एलएलबी ३'ची रिलीज डेट जाहीर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com