Urfi Javed Reality Show Related Talk
Urfi Javed Reality Show Related Talk Saam Tv
मनोरंजन बातम्या

Urfi Javed: उर्फी 'लॉक अप' अन् 'खतरों के खिलाडी' मध्ये जाणार? खुद्द तिनेच केला खुलासा...

Chetan Bodke

Urfi Javed Reality Show Related Talk: टेलिव्हिजन अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या हटक्यामुळे स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. ती तिच्या अनोख्या आणि आकर्षक कपड्यांमुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असते. बऱ्याच दिवसांपासून उर्फी रिॲलिटी शो 'लॉक अप' आणि 'खतरों के खिलाडी'मध्ये दिसणार असल्याची चर्चा सर्वत्र आहे, त्यानंतर आता याचा खुद्द उर्फीनेच खुलासा केला आहे.

उर्फी जावेद कंगना रणौतचा वादग्रस्त शो 'लॉक अप' आणि रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी'चा भाग असू शकते अशी चर्चा बर्‍याच दिवसांपासून होत होती. मात्र, आता उर्फीने ती त्या शोमध्ये दिसणार आहे की नाही याचा खुलासा केला आहे. उर्फी म्हणते, “ती दोन्ही शोचा भाग बनणार नाही. कारण या दोन्ही शोमध्ये दिसण्यासाठी तिला संपर्क करण्यात आलेला नाही.”

सोबतच पुढे उर्फी म्हणते, “तुम्हाला असं वाटतं का मी जेलमध्ये जाऊ? साधं मला त्या शोच्या निर्मात्यांनी विचारलं ही नाही, मग मी कशी काय जाऊ? तुम्ही सर्वांनी लिहून घ्या लागलं तर, मी त्या शोमध्ये भाग घेणार नाही. त्या शोमध्ये मी कशी काय जाऊ? मी तिथे गेल्यानंतर मी फॅशन कशी काय करु? मग माझ्या फॅशनच्या बातम्या तुम्ही कसे काय दाखवणार?” असं म्हणत तिने यावेळी माध्यमांसमोर संवाद साधला.

उर्फी ‘लॉक अप’ आणि ‘खतरों के खिलाडी’मध्ये सहभाग घेणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. पण ही अफवा होती. मात्र, अभिनेत्रीच्या नकारानंतर उर्फीचे चाहते कदाचित दु:खी झाली असल्याची चर्चा सध्या होत आहे. अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटोशूट व्हिडिओ शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले आहेत. यापूर्वी उर्फीने अनेक बड्या एजन्सीसाठी फोटो काढले आहेत. तेव्हापासून सोशल मीडियावर ते फोटो व्हायरल होत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cow Bike Riding Video: सगळं काही शक्य! गायीने केली बाईक रायडिंग, VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ

PM मोदींनी चार टप्प्यांत 270 चा जागांचा टप्पा ओलांडला, अमित शहा यांचा दावा

Eggs : उकडलेली अंडी किती दिवस टिकतात?

Singham Again Shooting In Jammu : 'सिंघम अगेन'च्या सेटवरून फायटिंगचा सीन व्हायरल; अजय- जॅकी एकमेकांना भिडले...

SRH vs PBKS: अखेरच्या सामन्यात पंजाबच्या फलंदाजांची बॅट तळपली! हैदराबादसमोर विजयासाठी २१५ धावांची गरज

SCROLL FOR NEXT