
Abdu Rozik Net Worth: 'बिग बॉस १६' पूर्वी अब्दू रोझिकची भारतात जास्त ओळख नव्हती, पण आज तो संपूर्ण देशाचा सर्वात आवडता चेहरा बनला आहे. 'मुर्ती लहान पण किर्ती महान' असणाऱ्या अब्दुने आपल्या स्माईलने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. 'बिग बॉस १६' मधून लोकप्रिय झालेल्या अब्दूचे नशीबही उजळले आहे. तो लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे, त्यासोबतच तो मुंबईत आपला व्यवसायही प्रस्थापित करणार असल्याची सध्या सर्वत्रच चर्चा होत आहे.
अब्दु रोझिक लवकरच मुंबईत आपले नवं रेस्टॉरंट उघडत आहे. त्याच्या रेस्टॉरंटमध्ये बर्गर देखील असेल, जो त्याचा फारच आवडता पदार्थ आहे. काही वेळापूर्वी, जेव्हा अब्दू विमानतळावर स्पॉट झाला तेव्हा त्याने ही आनंदाची बातमी शेअर करून चाहत्यांना गुड न्यूज दिली. 6 मार्चला रेस्टॉरंटचे उद्घाटन करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. तो सध्या भारताबाहेर आहे, पण रेस्टॉरंटच्या लॉन्चिंगसाठी तो भारतात परतणार आहे. भारतात स्वतःचे घर घेण्याचाही तो विचार करत आहे.
वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी अब्दू रोझिक हे करोडोंचे मालक आहेत. 'बिग बॉस'मध्ये त्याला एका शोची ऑफर मिळाली होती, जो केवळ त्याच्यावर बनणार होता. याशिवाय त्याच्याकडे अनेक प्रोजेक्ट्स देखील आहे, ज्यामुळे अब्दूने मध्येच सलमान खानच्या शोला अलविदा केला होता. अब्दुलचा दुबईत राजेशाही थाट आहे. ताजिकिस्तानमध्येही अब्दू अभिमानाने जगतो. आपल्या मनमोहक आवाजामुळे जगभरात प्रसिद्ध असलेल्या अब्दुची एकूण संपत्ती तुम्हाला थक्क करेल. तरुण वयात, अब्दू 2 दशलक्ष डॉलर्सच्या मालमत्तेचा मालक आहे.
अब्दु रोजिक 23 सप्टेंबर 2003 रोजी ताजिकिस्तानमध्ये जन्मलेला अब्दू रोजिक लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून तो हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याच्या बातम्या आहेत. याशिवाय तो परदेशातील 'बिग ब्रदर'च्या नव्या सीझनमध्येही दिसणार आहे. 'बिग बॉस १६' च्या फिनालेमध्ये खुद्द अब्दूनेच याची घोषणा केली होती.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.