Mitali Mayekar: मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा ‘अपवित्र’ फोटो सोशल मीडियावर व्हायरल, कॅप्शनने वेधले सर्वांचेच लक्ष

नुकतंच मितालीने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे.
Mitali Mayekar
Mitali MayekarSaam Tv

Mitali Mayekar: मराठी अभिनेत्री दिवसेंदिवस सोशल मीडियावर बऱ्याच चर्चेत राहत आहेत. त्यांच्या अभिनयासोबतच सोशल मीडियावरील पोस्ट देखील सर्वत्रच चर्चेत राहतात. आपल्या उत्तम अभिनयशैलीनं मितालीने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण करत स्वत:चं स्थान पक्कं केलं. तिच्या फॅशनची ही चर्चा नेहमीच चाहत्यांमध्ये होत असते. नुकतंच मितालीने अंघोळ करतानाचा एक फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला.

Mitali Mayekar
Rakhi Sawant News: राखीचा चाहत्यांना आत्मनिर्भर राहण्याचा सल्ला, घटस्फोटानंतर तिच्या डोक्यात प्रकाश पडला

मिताली मयेकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये तिने तिचा अंघोळ करतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला मितालीने ‘अपवित्र’ असं कॅप्शन दिलं आहे.

Mitali Mayekar
Ranbir Kapoor New Project: सौरव गांगुली नाही तर 'या' प्रसिद्ध गायकाच्या जीवनप्रवासावर 11 वर्षांपासून काम करतोय रणबीर कपूर

ही टेलिव्हिजन अभिनेत्री सध्या मध्यप्रदेशात भ्रमंती करत आहे. तिने शेअर केलेला हा फोटो बांधवगड जंगल सफारी करतानाचा आहे. बांधवगड हे जंगल सफारीसाठी खास प्रसिद्ध असून या ठिकाणी पर्यटकांना हमखास वाघाचं दर्शन होते. तिने वाघाची देखील एक पोस्ट आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिचा हा अंघोळ करतानाचा फोटो पाहून नेटकरी कमालीचे थक्क झाले आहे. सोबतच तिला यावेळी नेटकऱ्यांनी सल्ले देत ट्रोल देखील केले आहे.

Mitali Mayekar
Rashmika Madanna: 'अगं काय कपडे घातले?', ट्रोलर्सने नॅशनल क्रशला थेट तुलना केली उर्फीसोबत

दरम्यान मितालीने वयाच्या १३ व्या वर्षी इरफान खानच्या ‘बिल्लू’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ती ‘असंभव’, ‘अनुबंध’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘उंच माझा झोका’ आणि ‘तू माझा सांगाती’ अशा अनेक मराठी मालिकांमध्ये सहाय्यक अभिनेत्री म्हणून झळकली. त्याबरोबर ती ‘उर्फी’ या चित्रपटातही प्रमुख भूमिकेत दिसली.

Mitali Mayekar
Joseph Manu James: प्रसिद्ध ३१ वर्षीय चित्रपट निर्मात्याचे निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

तसेच २०१६ मधील ‘फ्रेशर्स’ या मालिकेतून तिने सायली बनकर नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. त्याबरोबर हल्लीच मितालीने टेलिव्हिजन विश्वात पुनरागमन केले. तिने ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेत ‘कस्तुरी साटम’ हे पात्र साकारलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com