Dipika Kakar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Dipika Kakar : ११ दिवसांनी दीपिका कक्कर घरी परतली, भावुक पोस्ट करत म्हणाली...

Dipika Kakar Health Update : दीपिका कक्करला 11 दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर आता डिस्चार्ज देण्यात आला आहे. तिचे हेल्थ अपडेट जाणून घेऊयात.

Shreya Maskar

अखेर टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करला (Dipika Kakar) हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. याची माहिती दीपिकाने स्वतःपोस्ट करून चाहत्यांना दिली आहे. अलिकडेच तिने आपल्याला स्टेज-2 कर्करोग (Stage-2 cancer) झाल्याची माहिती दिली होती. तेव्हापासून आपले हेल्थ अपडेट दीपिका आणि तिचा नवरा शोएब इब्राहिम ( Shoaib Ibrahim ) चाहत्यांसोबत शेअर करत आहे. दीपिकाच्या लिव्हरमध्ये टेनिस बॉलच्या आकाराचा ट्युमर असल्याची माहिती त्यांनी चाहत्यांना दिली होती.

दीपिकाला स्टेज-2 कर्करोगाचा निदान झाल्यावर अलिकडेच तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. दीपिका १४ तास ओटीमध्ये होती. शस्त्रक्रियेनंतर आता दीपिका कक्कर पुन्हा स्वतःच्या घरी आली आहे. आपल्या हेल्थची अपडेट तिने चाहत्यांना शेअर केली आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिचा हॉस्पिटलमधील फोटो आणि हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसोबत काढलेले फोटो दिसत आहे. फोटोमध्ये दीपिका आनंदी दिसत आहे. तिने या पोस्टला एक खास कॅप्शन दिले आहे.

दीपिका कक्कर पोस्ट

"11 दिवसांनंतर घर जात आहे. ट्यूमर काढला आहे. हे 11 दिवस खूप कठीण होते. मात्र आजूबाजूला असलेल्या चांगल्या आणि सकारात्मक लोकांमुळे सगळं काही सुरळीत झाले. त्रास होत होता पण कोकिलाबेन हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी खूप चांगल्या प्रकारे गोष्टी सांभाळल्या. डॉ. सोमनाथ चटोपाध्याय आणि त्यांच्या टीम डॉ. कांचन, डॉ. नेहा, डॉ. संकेत, डॉ. मानेक आणि डॉ. कविता हे सर्वजण फक्त उत्तम डॉक्टरच नाहीत तर एक चांगले माणूस देखील आहेत!चांगले उपचार, इतके प्रेम आणि सहानुभूतीने सर्व केल्यावर रुग्ण लवकर बरा होतो. तसेच त्याला आजाराशी लढण्याची हिंमत मिळते.

माझ्याकडे लक्ष देणाऱ्या सर्व बहिणी, कर्मचारी डॉ शर्मिला (अनेस्थेटिस्ट), डॉ बुशरा (आयसीयू डॉ), बहीण अक्षरा, नुपूर, प्रगती आणि शशीका (आयसीयू बहिणी), बहिण अनुपमा, आशना आणि बहीण जिजीन (वॉर्ड सिस्टर्स) आणि सर्व महिला मदत कर्मचाऱ्यांचा मी तुमच्या सर्वांच्या प्रेमासाठी आभारी आहे. कारण तुम्ही सर्वांनी माझी खूप चांगली काळजी घेतली. तुमच्यामुळे मी लवकर बरी होऊन घरी जात आहे. तुम्ही सर्वांनी माझ्यावर केलेले प्रेम, प्रार्थना आणि आशीर्वाद ही माझी सर्वात मोठी ताकद आहे. दिल से थँक्स यू...तुमचे सर्वांचे प्रेम पाहून मला खूप ताकद मिळाली. यापुढील माझे उपचार सुरळीत होऊ दे आणि मला हिंमत मिळू दे यासाठी प्रार्थना करा. सर्वांना खूप खूप प्रेम..."

दीपिका कक्करने शेअर केलल्या पोस्टवर कलाकार आणि चाहत्यांकडून कमेंट्स, लाइक्सचा वर्षाव होत आहे. दीपिकाने पोस्टमधून चाहते, डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: तू नाही आलास तर मला..., सावकाराच्या जाचाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या; कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

Early signs of lung cancer : फुफ्फुसांचा कॅन्सर होण्यापूर्वी शरीरात होतात 'हे' ४ मोठे बदल; दुर्लक्ष करणं पडेल महागात

Maharashtra Live News Update : शरद पवार आझाद मैदानावर दाखल

Today Gold Rate: खुशखबर! सोन्याचे दर ६०० रुपयांनी घसरले; प्रति तोळ्यामागे किती पैसे मोजावे लागणार?

Birthday Tradition: वाढदिवसा दिवशी डोक्यावर रुमाल किंवा पांढरी टोपी का ठेवतात? जाणून घ्या खरे कारण

SCROLL FOR NEXT