Border 2 : 'हाऊसफुल ५'च्या अभिनेत्रीला लागली लॉटरी? सनी देओलच्या 'बॉर्डर-२'मध्ये झळकणार

Sonam Bajwa : 'हाऊसफुल ५' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अशात 'हाऊसफुल ५'च्या अभिनेत्रीची 'बॉर्डर २'मध्ये वर्णी लागल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
Sonam Bajwa
Border 2SAAM TV
Published On

बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या त्याच्या चित्रपटांमुळे चांगलाच चर्चेत आहे. आता सनी देओल 'बॉर्डर 2'मधून (Border 2) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सनी देओलसोबत बॉलिवूडचा हँडसम हंक वरुण धवन देखील पाहायला मिळणार आहे. आता या चित्रपटासंबंधी मोठी अपडेट समोर आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 'बॉर्डर 2'मध्ये 'हाऊसफुल 5'मधील एका अभिनेत्रीची वर्णी लागली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सोनम बाजवा (Sonam Bajwa) आहे. सोनम बाजवाने आपल्या ग्लॅमरस अंदाजने 'हाऊसफुल 5' चित्रपटाला चार चाँद लावले आहेत. आता 'बॉर्डर 2'मध्ये आपला धमाकेदार अभिनय दाखवण्यासाठी सोनम बाजवा चित्रपटात एन्ट्री घेणार आहे. ती एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. असे बोले जात आहे की, सोनम जूनच्या शेवटी चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करेल.

'बॉर्डर 2'मध्ये सोनम बाजवा एका पंजाबी मुलीची भूमिका साकारणार आहे. मात्र याबाबत अद्याप कोणताही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही आहे. 'बॉर्डर 2' हा 1997 ला रिलीज झालेल्या 'बॉर्डर' चित्रपटाचा सीक्वल आहे. जवळपास 27 वर्षांनंतर 'बॉर्डर २' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या 'बॉर्डर 2'चे कलाकार चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. 'बॉर्डर 2' नवीन वर्षी 23 जानेवारी 2026ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'बॉर्डर 2' चित्रपटाचे दिग्दर्शक जेपी दत्ता हे आहेत. या चित्रपटात सनी देओलसोबत वरुण धवन, जॅकी श्रॉफ, अक्षय खन्ना आणि सुनील शेट्टी झळकणार आहेत. 'बॉर्डर 2' चित्रपटाची कथा 1971 मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. सध्या अभिनेत्री सोनम बाजवाचा 'हाऊसफुल 5' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 133.25 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

Sonam Bajwa
Housefull 5 Box Office Collection : अक्षय कुमारचा 'हाऊसफुल ५' लवकरच गाठणार १५० कोटींचा टप्पा, ८व्या दिवशी कलेक्शनचा आकडा किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com