Housefull 5 Box Office Collection : 'हाऊसफुल 5'नं 'सिकंदर'ला टाकले मागे, पाचव्या दिवशी कलेक्शनचा आकडा किती?

Housefull 5 Box Office Collection Day 5: अक्षय कुमारच्या 'हाऊसफुल 5' चित्रपटाने सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाला मागे टाकले आहे. 'हाऊसफुल 5' चित्रपटाने पाचव्या दिवशी किती कोटींचा व्यवसाय केला जाणून घेऊयात.
Housefull 5 Box Office Collection Day 5
Housefull 5 Box Office CollectionSAAM TV
Published On

बहुप्रतिक्षित चित्रपट 'हाऊसफुल 5' (Housefull 5) 6 जूनला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. 'हाऊसफुल 5' हा 'हाऊसफुल' फ्रँचायझीचा 5 वा भाग आहे. 'हाऊसफुल 5'मध्ये कॉमेडी आणि ॲक्शन पाहायला मिळत आहे. 'हाऊसफुल 5'ची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केले आहे.

'हाऊसफुल 5'ने पाचव्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. या चित्रपटाने सलमान खानच्या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. 'हाऊसफुल 5' थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. 'हाऊसफुल 5' चे पाचव्या दिवसाचे कलेक्शन जाणून घेऊयात.

'हाऊसफुल 5' बॉक्स ऑफिसवर कलेक्शन दिवस 5

  • दिवस पहिला - 24 कोटी रुपये

  • दिवस दुसरा - 31 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 32 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 13.50 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 10.75 कोटी रुपये

  • एकूण - 111.25 कोटी रुपये

दोन वेगळे क्लायमॅक्स

'हाऊसफुल 5' हा चित्रपट सुरुवातीपासून त्याच्या दोन वेगवगेळ्या क्लायमॅक्ससाठी ओळखला जातो. 'हाऊसफुल 5 ए' आणि 'हाऊसफुल 5 बी' असे चित्रपटाचे दोन क्लायमॅक्स आहेत. प्रेक्षकांकडून चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

'हाऊसफुल 5'नं 'सिकंदर'ला टाकले मागे

'हाऊसफुल 5'ने रिलीजच्या पाचव्या दिवशी 10.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाने पाचव्या दिवशी 8.28 कोटी कोटींची कमाई केली होती. भविष्यात चित्रपट अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक करेल असे बोले जात आहे.

'हाऊसफुल 5' स्टारकास्ट

'हाऊसफुल 5' चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख ,अभिषेक बच्चन यांची भन्नाट कॉमेडी पाहायला मिळत आहे. चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस, नर्गिस फाखरी, नाना पाटेकर, श्रेयस तळपदे, संजय दत्त , फरदीन खान आणि जॅकी श्रॉफ या कलाकारांनी धुमाकूळ घातला आहे.

Housefull 5 Box Office Collection Day 5
Khushi-Vedang : हात पकडला अन्...; खुशी कपूर-वेदांग रैनामध्ये नेमकं काय घडलं? व्हायरल VIDEOनं वेधलं लक्ष

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com