Top Marathi Serial On OTT Saam Tv
मनोरंजन बातम्या

Top Marathi Serial On OTT: टिव्हीवरच नाही तर ओटीटीवरही ‘ठरलं तर मग’चीच हवा; ‘प्रेमाची गोष्ट’ आणि ‘ठिपक्यांची रांगोळी’ आहे इतक्या क्रमांकावर

Marathi Serial TRP: टिव्हीप्रमाणेच आता ओटीटीवर प्रसारित होणाऱ्या मालिकेंच्या टीआरपीचा आकडा समोर आला आहे.

Chetan Bodke

Top Marathi Serial On OTT

टेलिव्हिजन सिरीयल प्रेक्षकांच्या जीवनातला एक अविभाज्य घटक बनला आहे. चित्रपट किंवा वेबसीरीज पेक्षा मालिकेचा चाहतावर्गही बराच मोठा आहे. बदलत्या जीवनशैलीप्रमाणे प्रेक्षकांचे मनोरंजनाचे माध्यम दिवसेंदिवस बदलत आहे. आता प्रेक्षकांचा टिव्ही आणि थिएटरपेक्षा ओटीटीकडे सर्वाधिक कल आहे. प्रेक्षकवर्ग सर्वाधिक ओटीटीवरही सिरीयल्स पाहत असतात. नुकतंच ओटीटीवर प्रसारित होणाऱ्या मालिकेचा टीआरपीचा आकडा समोर आला आहे.

टीआरपी लिस्टमध्ये जुई गडकरी आणि अमित भानुशाली यांची ‘ठरलं तर मग’ ही मालिका आहे. टेलिव्हिजनवरच नाही ओटीटीवर सुद्धा या मालिकेने बाजी मारली आहे. तर तेजश्री प्रधानची 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका दुसऱ्या स्थानी आहे. 'आई कुठे काय करते' ही मालिका तिसऱ्या स्थानी आहे. 'सुख म्हणेज नक्की काय असतं' आणि 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिका अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत. टीआरपीचे हे आकडे ०४ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यानचे आहेत. (Serial)

गेल्या आठवड्यामध्ये टीव्ही मालिकांचे जाहीर केलेल्या टीआरपी आकड्यांनुसार, ‘ठरलं तर मग’ मालिका पहिल्या स्थानी होती. तर ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका दुसऱ्या स्थानी होती. तर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेने टीआरपी यादीमध्ये अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत. तर स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ पाचव्या स्थानी होती. (Latest News)

ओटीटीवर आणि टीव्हीवरही टीआरपी रेटिंगमध्ये ‘ठरलं तर मग’ ही मालिका अग्रस्थानी आहे. सध्या ह्या मालिकेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. मालिकेला टीआरपी चार्टमध्ये सर्वाधिक पॉईंट्स मिळालेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेची वेळ बदलणार आहे. तर ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Results : भाजपच 'दादा'! राष्ट्रवादीला जबरी धक्का, वाचा पुण्यातील आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची यादी

CM देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का; मामेभावाचा दारुण पराभव

Maharashtra Elections Result Live Update : सांगलीत भाजपनं केला करेक्ट कार्यक्रम; ४ प्रभागांमध्ये भाजपच्या पॅनलमधील सर्व उमेदवार विजयी

Mental Health: सकाळी उठल्यावर 'या' 5 गोष्टी चुकूनही करू नका, दिवसभर आळस अन् ताण येईल

Love Story: मुलगा हमाली करतो म्हणून नकार,आज आहे सुखी संसार; अशी आहे बिग बॉस फेम रोशन भजनकरची फिल्मी लव्हस्टोरी

SCROLL FOR NEXT