Top TRP Marathi Serial: जुई गडकरी आणि तेजश्री प्रधानची टक्कर! टीव्हीप्रमाणे ऑनलाईनवरही 'ठरलं तर मग!'चं वर्चस्व

Jui Gadkari: ऑनलाईन टीआरपी रेटिंगमध्ये जुई गडकरीची मालिका 'ठरलं तर मग!' पहिल्या स्थानी आहे.
Marathi Serial TRP Rating October 2023
Marathi Serial TRP Rating October 2023Saam Tv
Published On

Tharal Tar Mag Online TRP:

टीव्हीप्रमाणेच सध्या ऑनलाईन मालिका बघण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. मालिकांचा प्रेक्षक वर्ग हा मुख्यतः स्त्रिया असतात. आता अनेक स्त्रिया नोकरीसाठी घराबाहेर पडतात. त्यांना घरी येऊन टीव्ही पाहून शक्य होत नाही. त्यामुळे प्रवासातच त्या त्यांच्या आवडत्या मालिका पाहण्याचा आनंद घेतात.

ऑनलाईन म्हणजे मोबाईल, लॅपटॉप, टॅब या उपकरणांवर कोणती मालिका सर्वांत जास्त पाहिली जाते याचे आकडे समोर आले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Marathi Serial TRP Rating October 2023
Deepika-Ranveer Wedding Video: 5 वर्षांनंतर समोर आला दीपिका- रणवीरच्या लग्नाचा अनसीन व्हिडीओ; तुम्ही पाहिलात का?

ऑनलाईन टीआरपी रेटिंगमध्ये जुई गडकरीची मालिका 'ठरलं तर मग!' पहिल्या स्थानी आहे. तर तेजश्री प्रधानची 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका दुसऱ्या स्थानी आहे. 'आई कुठे काय करते' ही मालिका तिसऱ्या स्थानी आहे. 'सुख म्हणेज नक्की काय असतं' आणि 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिका अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत. टीआरपीचे हे आकडे १४ ऑक्टोबर - २० ऑक्टोबर या दरम्यानचे आहेत.

गेल्या आठवड्यात माहितीनुसार टीव्ही मालिकांचे आकडे जाहीर करण्यात आले होते. यामध्ये 'ठरलं तर मग!' मालिका पहिल्या स्थानी होती. तर 'तुझेच मी गीत गात आहे' मालिका दुसऱ्या स्थानी होती. तर स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' पाचव्या स्थानी होती. (Latest Entertainment News)

Marathi Serial TRP Rating October 2023
Malaika Arora Video: झी मराठी पुरस्कार सोहळ्यात मलायकाचा धमाकेदार डान्स; मराठी कलाकारांनाही पडली अभिनेत्रीच्या सौंदर्याची भुरळ

ऑनलाईन आणि टीव्हीवारी टीआरपी रेटिंगमध्ये 'ठरलं तर मग!' ही मालिकाच वरचढ ठरली आहे. दोन्ही ठिकाणी या मालिकेचं टीआरपी रेटिंग सर्वात जास्त आहे.

आता असे वृत्त आहे की 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेची वेळ बदलणार आहे. तर 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. (Serial)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com