Deepika-Ranveer Wedding Video: 5 वर्षांनंतर समोर आला दीपिका- रणवीरच्या लग्नाचा अनसीन व्हिडीओ; तुम्ही पाहिलात का?

Koffee With Karan 8: लग्नाच्या पाच वर्षांनंतर ‘कॉफी विथ करण’च्या ८ व्या सीझनमध्ये रणवीर- दीपिकाच्या लग्नाचा अनसीन व्हिडीओ समोर आलाय.
Deepika-Ranveer Wedding Video
Deepika-Ranveer Wedding VideoSaam Tv
Published On

Deepika-Ranveer Wedding Video

सध्या सोशल मीडियावर करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’च्या ८ व्या सीझनची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये दीपिका- रणवीर सहभागी झाले होते. अशातच लग्नानंतर पाच वर्षांनी पहिल्यांदाच रणवीर- दीपिकाच्या लग्नातला पहिला- वहिला व्हिडीओ समोर आलाय. दरम्यान, त्यांच्या लग्नातले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, पण त्यांच्या लग्नातला व्हिडीओ आजवर कुठेही समोर आला नव्हता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Deepika-Ranveer Wedding Video
Laxmikant Berde Birthday: लक्ष्याने महेश कोठारे यांच्या चित्रपटासाठी फक्त एक रूपया घेतलं होतं मानधन, तुम्हाला माहितीये का हा किस्सा?

दीपिका आणि रणवीरच्या लव्हस्टोरीची चर्चा ‘रामलीला’ चित्रपटापासूनच सुरु झाली होती. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दीपिका आणि रणवीरने २०१८ मध्ये इटलीतल्या लेक कोमो या अतिशय सुरेख आणि निसर्गाच्या कुशीत असणाऱ्या एका ठिकाणी लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नातले फोटो आपण सोशल मीडियावर पाहिले असतील, तर व्हिडीओ कुठेच दिसले नाहीत. नुकतीच ‘दीपवीर’ने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’च्या ८ व्या सीझनमध्ये हजेरी लावली होती. आता करणच्या या शोमुळे ‘दीपवीर’च्या चाहत्यांना त्यांच्या लग्नातला व्हिडिओ पाहायला मिळाला आहे.

सध्या सोशल मीडियावर ‘दीपवीर’च्या लग्नातला व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये आपल्याला त्यांच्या लग्नामध्ये झालेल्या विधींमधील सर्वच दृश्ये पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओमध्ये, मेहेंदी, हळद, लग्नाच्या विधी आणि रिसेप्शन अशा सर्वच कार्यक्रमातले दृश्य दिसत आहेत. इटलीमध्ये ‘दीपवीर’ लग्नबंधनात अडकले होते. लग्नाच्या वेळी आपल्या आवडत्या सेलिब्रिटींनी कशी धमालमस्ती केली, हे आपल्याला व्हिडीओमध्ये दिसत आहे. दीपिकाने लग्नामध्ये लाल लेहेंगा तर रणवीर सिंहने पांढरा सदरा परिधान केला होता. लग्नाच्या लूकमध्ये दोघेही प्रचंड सुंदर दिसत आहेत. सध्या ‘दीपवीर’च्या लग्नातला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. (Social Media)

Deepika-Ranveer Wedding Video
Elvish Yadav Registerd FIR: बिग बॉस विजेता एल्विश यादवकडे १ कोटींच्या खंडणीची मागणी, गुन्हा दाखल

लग्नानंतर पहिल्यांदाच हे क्यूट कपल एकत्र दिसल्यामुळे अनेक मोठे खुलासे होणार होते. ‘कॉफी विथ करण’च्या ८ व्या सीझनमधला पहिला भाग २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री प्रदर्शित झाला आहे. लग्नाच्या अनेक वर्षांनंतर या जोडीच्या लग्नाचा व्हिडीओ समोर आल्यामुळे चाहते खूपच आनंदित आहेत. ‘दीपवीर’च्या लग्नातला व्हिडीओ पाहून करण जोहरसुद्धा भावूक झाला. “मी अनेक वर्ष एकटाच आहे. मला नेहमीच वाटायचे की, माझीही तुमच्यासारखीच एखादी लव्हस्टोरी असावी. आमची ती स्टोरी मी जगाला सांगु शकेल.” त्यांच्या लग्नातला हा व्हिडीओ पाहून तुमचेही नक्कीच डोळे पाणावतील, यात शंका नाही.

Deepika-Ranveer Wedding Video
Thalaivar 170 Movie: 33 वर्षांनंतर 'थलाइवर 170'च्या निमित्ताने दोन सुपरस्टार एकत्र, रजनीकांत यांनी शेअर केला बिग बींसोबतचा फोटो

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com