साऊथचे सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) आणि बॉलिवूडचे (Bollywood) 'महानायक' अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) लवकरच स्क्रिन शेअर करणार आहेत. पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही जोडी एकत्र मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
रजनीकांत आणि बिग बी लवकरच 'थलाइवर 170' या चित्रपटाच्या (Thalaivar 170 Movie) माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल ३३ वर्षांनंतर या चित्रपटाच्या माध्यमातून दोघे एकत्र काम करणार आहेत. नुकताच या चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात झाली आहे. रजनीकांत यांनी सोशल मीडियावर बिग बींसोबतचा फोटो शेअर केला असून तो चांगलाच व्हायरल होत आहे.
नुकताच रजनीकांत यांनी बिग बींची भेट घेतली. या भेटीदरम्यान काढलेला फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला. रजनीकांत यांनी अमिताभ बच्चन यांना आपले गुरू मानले आहे. दोघेही लवकरच दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल यांच्या 'थलाइवर 170' या चित्रपटात दिसणार आहेत. बुधवारी या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली. चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याची माहिती दोन्ही कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. रजनीकांत आणि बच्चन यांनी यापूर्वी 33 वर्षांपूर्वी 1991 मध्ये आलेल्या 'हम' चित्रपटात एकत्र काम केले होते.
'लायका प्रॉडक्शन'च्या बॅनरखाली तयार करण्यात आलेल्या 'थलाइवर 170' या चित्रपटाच्या माध्यमातून दोघांच्याही चाहत्यांना पूर्णपणे नवी कथा आणि पूर्ण मनोरंजनाचा डोस मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. ७२ वर्षीय रजनीकांतही या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. सेटवर त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक फोटो काढला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला.
रजनीकांत यांनी बिगबींसोबतचा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करत असे लिहिले आहे की, 'मी 33 वर्षांनंतर माझे गुरू अमिताभ बच्चन यांच्यासोबत पुन्हा काम करत आहे. टीजे ज्ञानवेल यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या 'थलाइवर 170' या चित्रपटात आम्ही काम करत आहोत. मी खूप आनंदी आहे.
तर दुसरीकडे 81 वर्षीय अमिताभ बच्चन यांनीही त्यांच्या वैयक्तिक ब्लॉगवर याबाबत माहिती दिली होती. त्यांनी असे लिहिले की, 'आज एका नवीन चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले. मी या चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबत काम करत आहे. त्यांनी रजनीकांत यांचे वर्णन 'असामान्य माणूस' असे केले.
दरम्यान, 'थलाइवर 170' या चित्रपटाची घोषणा मार्चमध्ये करण्यात आली होती. रजनीकांत यांचा हा 170 वा चित्रपट असेल. त्यामुळे या चित्रपटाला 'थलाइवर 170' असे नाव देण्यात आले आहे. या चित्रपटात फहद फासिल, राणा दग्गुबती, रितिका सिंग, मंजू वॉरियर आणि दुशारा विजयन हे मुख्य भूमिकेत आहेत. सुबास्करन हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर अनिरुद्ध रविचंद्र चित्रपटाचे संगीतकार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.