ब्रेकअपनंतर Ankita Lokhandeने अडीच वर्षे Sushant Singh Rajputची वाट पाहिली, अभिनेत्रीने पुन्हा केला मोठा खुलासा

Ankita Lokhande On Breakup With Sushant Singh Rajput: अंकिताने पुन्हा एकदा तिचा एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपुतसोबतच्या ब्रेकअपबद्दलचा खुलासा केला आहे.
Ankita Lokhande And Sushant Singh Rajput
Ankita Lokhande And Sushant Singh RajputSaam Tv
Published On

Bigg Boss 17 Show:

'बिग बॉस १७' च्या (Bigg Boss 17) घरामध्ये एकत्र एन्ट्री घेतलेल्या अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पती विकी जैन (Vicky Jain) यांच्यामध्ये सतत वाद होत आहेत. काहीना काही कारणांवरून हे कपल भांडताना दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या नात्यातील दुरावा वाढत चालला आहे. या दोघांमधील वाद काही संपायचे नाव घेत नाहीये.

अशामध्ये अंकिताने पुन्हा एकदा तिचा एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपुतसोबतच्या (Sushant Singh Rajput) ब्रेकअपबद्दलचा खुलासा केला आहे. ब्रेकअपनंतर अडीच वर्षे सुशांतची वाट पाहिली असल्याचे अंकिताने सांगितले आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपुतचे नाते पुन्हा चर्चेत आले आणि तिने सुशांतसोबतच्या ब्रेकअपबद्दलचा खुलासा केला आहे. ब्रेकअपनंतर त्यांच्यामधील गोष्टी चांगल्या होण्यासाठी तिने अडीच वर्षे वाट पाहिली. अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत प्रसिद्ध मालिका 'पवित्र रिश्ता' च्या सेटवर भेटले. या मालिकेच्या सेटवरच दोघांची आधी मैत्री आणि नंतर प्रेम झाले. पण त्यांचे नातं फारकाळ टिकलं नाही. २०१६ मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला. त्यामुळे दोघांच्याही चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. सध्या अंकिताची एक मुलाखत व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने सुशांतसोबतच्या ब्रेकअपबद्दल सांगितले आहे.

Ankita Lokhande And Sushant Singh Rajput
Bollywood Celebrities At Wankhede: टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंडचा सामना पाहण्यासाठी एकपेक्षा एक सुपरस्टार वानखेडे स्टेडियमवर

'बिग बॉस 17'च्या घरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी अंकिता लोखंडेने 'बीबीसी न्यूज हिंदी'ला दिलेल्या मुलाखतीत दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबतच्या तिच्या ब्रेकअपबद्दल सांगितले होते. तिने सांगितले होते की, 'वेगळे होऊनही मी सुशांत सिंह राजपूतची वाट पाहत होते. २ वर्षांपेक्षा जास्त काळ मी त्याची वाट पाहिली. खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर ३१ जानेवारीला मी आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला.'

Ankita Lokhande And Sushant Singh Rajput
OTT Release This Week: चित्रपटप्रेमींसाठी OTT वर स्पेशल मेजवानी; ॲक्शन, ड्रामा अन् रोमान्सने भरलेले चित्रपट आणि वेबसीरिज होणार रिलीज

अंकिताने सांगितले होते की, माझे घर माझ्या आणि सुशांतच्या फोटोंनी भरले होते आणि जेव्हा मी पुढे जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी आईला सर्व फोटो काढून आणि फाडून टाकण्यास सांगितले होते. अडीच वर्षे मला आशा होती की सर्व काही ठीक होईल. पण तसं झालं नाही. ३१ जानेवारीचा दिवस होता. माझ्या घरात आम्हा दोघांचे खूप फोटो होते आणि त्या दिवशी मी ठरवले आणि आईकडे गेले. सगळे फोटो फाडण्यास सांगितले. ज्या दिवशी माझ्या आईने सर्व फोटो काढून फाडले होते त्या दिवशी मी खूप रडले होते.' दरम्यान, अंकिताने हे देखील कबूल केले की तिने त्यांचे नाते सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु काहीही झाले नाही.

Ankita Lokhande And Sushant Singh Rajput
Nana Patekar Slaps Fan: सेल्फी घ्यायला आलेल्या चाहत्याला नाना पाटेकरांनी फटकावले; व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com