Allu Arjun Net Worth Saam Tv
मनोरंजन बातम्या

Allu Arjun Net Worth: प्रायव्हेट जेट अन् १०० कोटींचा बंगला; अल्लू अर्जुनची संपत्ती पाहून व्हाल आश्चर्यचकित

Allu Arjun Birthday: अल्लू अर्जुनची संपत्ती किती?, तो महिन्याला किती कमावतो?, एका चित्रपटासाठी अल्लू अर्जून किती मानधन घेतो? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

Chetan Bodke

Allu Arjun Net Worth

“पुष्पा राज... मैं झुकेगा नहीं साला” म्हणत दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन अगदी लहानांपासून थोरामोठ्यापर्यंत सर्वांमध्येच प्रसिद्ध झाला. टॉलिवूडसह बॉलिवूडमध्ये अल्लू अर्जुनच्या अभिनयाची क्रेझ कायम आहे. आज अभिनेत्याचा ४२ वा वाढदिवस आहे. आतापर्यंत अल्लू अर्जुनने कोणकोणते चित्रपट केले, तो या इंडस्ट्रीत कधी आला ही माहिती सगळ्यांनाच माहितीये. पण अल्लूची संपत्ती किती?, तो महिन्याला किती कमावतो?, एका चित्रपटासाठी अल्लू अर्जून किती मानधन घेतो? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. (Tollywood)

अल्लू अर्जुनचा जन्म ८ एप्रिल १९८२ रोजी चेन्नईमध्ये जन्म झाला. अल्लू अर्जुनचं संपूर्ण कुटुंब सिनेसृष्टीसोबत जोडलं गेलेलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अल्लू अर्जूनची २०२४ मध्ये एकूण नेटवर्थ ४६० कोटी रुपयांच्या जवळपास आहे. अभिनेत्याची वर्षाची कमाई ४० कोटी रुपयांहून अधिकची आहे. दर महिन्याला ४ कोटींच्या आसपास अल्लू अर्जून कमावतो. फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीमध्ये त्याचं नाव आवर्जून घेतलं जातं. अर्जून एका चित्रपटासाठी १५ कोटींच्या आसपास मानधन घेतो. चित्रपटांव्यतिरिक्त तो जाहिरातींमधून आणि ब्रँड अँडोर्समेंटच्या माध्यमातून कोट्यवधी कमावतो. (Allu Arjun)

अल्लू अर्जुनचा हैदराबादमधील जुबली हिल्स भागात अलिशान बंगला आहे. अत्याधुनिक सोयीसुविधा आणि भव्य दिव्य असा त्याचा बंगला आहे. त्याचा बंगला ८००० चौरस फूट मध्ये बांधलेला आहे. त्याची ऐकून किंमत १०० कोटीं इतकी आहे. अल्लू अर्जुनने २०१५ मध्ये मुंबईमध्ये 2BHK फ्लॅट खरेदी केला होता. अभिनेत्याकडे एक ब्लॅक अलिशान खासगी व्हॅनिटी व्हॅनही आहे. त्याची किंमत ७ कोटींच्या आसपास आहे. अल्लू अर्जुनने त्याच्या व्हॅनिटी वॅनचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यासोबतच हैदराबादमध्ये ३०० जुबली हा नाइट क्लबही आहे. (Bollywood News)

अभिनेत्याकडे प्रायव्हेट जेट देखील आहे. त्याची किंमत ८० कोटी आहे. शिवाय अल्लू अर्जूनकडे महागड्या गाड्यांचं देखील कलेक्शन आहे. त्याच्याकडे अडीच कोटींची रेंज रोवर वोग आहे. त्याशिवाय ७५ लाख रूपयांची Hummer H2, ८० लाख रुपयांची BMW XS, १.२ कोटींची Jaguar XJL, ८६ लाखांची Audi A7 आहे.

अभिनेत्याचे स्वत:च्या मालकीचे हैदराबादमध्ये फिल्म स्टुडिओही आहे. हॅप्पी, देसामुदुरू, पारुगु, वेदम, जुले, रेस गुर्रम, S/0 सत्यमूर्ती, सररैनोदु, DJ: दुव्वाडा जगन्नाधाम, ना पेरु सूर्या, ना इल्लू इंडिया, अला वैकुंठपुरामुल्लू, पुष्पा: द राइज हे अल्लू अर्जुनचे गाजलेले चित्रपट आहेत.

अल्लूने १९८५ मध्ये वयाच्या तिसऱ्या वर्षापासून ‘विजेता’ चित्रपटातून बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर २००३ मध्ये त्याने 'गंगोत्री' चित्रपटातून इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केले आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाकोला पोलिसांची मोठी कारवाई, ५ वर्षांच्या मुलीचं अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Supreme Court: निवडणुका रद्द करू नाहीतर निकाल आम्ही देऊ: सर्वोच्च न्यायालय

मुलगी झाली म्हणून सासरकडून छळ; आयुष्य 'नकोसे' झाल्यानं महिलेने संपवली जीवनयात्रा

Navi Mumbai : अलिबाग, गोव्यापेक्षाही सुंदर आहे नवी मुंबईतील 'हा' समुद्रकिनारा

T20 World Cup 2026 Schedule : टी २० वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर; या दिवशी क्रिकेटचा महाकुंभमेळा होणार सुरू, रोहित शर्माकडं मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT