Star Pravah's Thipkyanchi Rangoli Serial Off Air Thipkyanchi Rangoli Serial - Instagram
मनोरंजन बातम्या

Thipkyanchi Rangoli Off Air: स्टार प्रवाहवरील आणखी एक मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत  दिली माहिती...

Marathi Television Serial Latest Update: प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Chetan Bodke

Thipkyanchi Rangoli Off Air

मराठी मालिकांची प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. घराघरात कायमच मराठी मालिका आवडीने पाहिल्या जातात. प्रेक्षकवर्ग मालिकेतील अनेक पात्र आपल्या कुटुंबातील असल्यासारखं ग्राह्य धरतात. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. याबद्दलची माहिती ‘ठिपक्यांची रांगोळी’फेम ज्ञानदा रामतीर्थकरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

स्टार प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेने प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन केले आहे. टीआरपी यादीमध्ये मालिकेला नेहमीच ही मालिका अव्वल होती. ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्यामुळे कलाकारांसह प्रेक्षकही नाराज झाले आहेत. एकत्र कुटुंब पद्धतीवर या मालिकेची कथ आधारित होती. मालिकेमध्ये अप्पू नावाचे पात्र साकारणाऱ्या ज्ञानदा रामतीर्थकरने शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचा फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

Dnyanada Ramtirthkar post

ऑक्टोबर २०२१ पासून ही मालिका टेलिकास्ट होत आहे. आता लवकरच ही मालिका ऑफ एअर होणार आहे. ७ नोव्हेंबर रोजी मालिकेच्या शूटिंगचा अखेरचा दिवस होता. अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने भावुक स्टोरी शेअर केली आहे. ती आपल्या स्टोरीमध्ये म्हणाली, “हाय अप्पू... आजच्या रात्रीची झोप माझ्यासाठी खूपच त्रासदायक असणार आहे... कारण उद्या मालिकेच्या शुटिंगचा शेवटचा दिवस आहे, या गोष्टीची मला कल्पनाही करवत नाही… कानिटकर वाडा... आपण दोघेही आपल्या आवडत्या ठिकाणी भेटणार आहोत... पण उद्याचा दिवस आपण साजरा करूया... लवकरच भेटू... प्रेम” (Serial)

त्या स्टोरीनंतर ज्ञानदाने काही वेळापूर्वी सुमी अर्थात अभिनेत्री नम्रता प्रधानसोबतचा मेकअप रुममधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये ज्ञानदा म्हणतेय की, “गुड मॉर्निंग… आज आमच्या सर्वांचा मालिकेच्या सेटवरचा शेवटचा दिवस असेल.” त्यानंतर अभिनेत्रीने आणखी एक स्टोरी टाकत, “चला आजचा शेवटचा दिवस अविस्मरणीय करू…” अशा आशयचे कॅप्शन देत स्टोरी शेअर केली आहे. (Entertainment News)

Thipkyanchi Rangoli Serial - Dnyanada Ramtirthkar post
Appu From Thipkyanchi Rangoli Serial - Dnyanada Ramtirthkar post

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur : फटाके आणायला गेले,पुन्हा परतलेच नाहीत; बहीण-भावासह पुतणीचा अपघाती मृत्यू, कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Goregaon Crime: इमारतीत शिरून मोबाईल चोरीचा प्रयत्न; ५ जणांकडून बेदम मारहाण, हाणामारीत तरुणाचा मृत्यू

Wednesday Horoscope : दिवाळी पाडव्याचा आनंद द्विगुणीत होणार; महत्वाची कामे दुपारनंतर करा, अन्यथा...

Maharashtra Live News Update: ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

SCROLL FOR NEXT