Sharad Ponkshe Video : मालिकेचे नुकसान होऊ नये... म्हणत शरद पोंक्षेंची ठिपक्यांची रांगोळी मालिकेतून एक्झिट

Sharad Ponkshe On Thipkyanchi Rangoli Serial : माझ्यामुळे त्या मालिकेचे नुकसान होऊ नये म्हणून ५०० भाग पूर्ण झाल्यावर मी ती मालिका सोडलेली आहे.
Sharad Ponkshe Left Marathi Serial Thipkyanchi Rangoli
Sharad Ponkshe Left Marathi Serial Thipkyanchi RangoliSaam TV
Published On

Sharad Ponkshe Exit From Marathi Serial Thipkyanchi Rangoli:

स्टार प्रवाहवरील 'ठिपक्यांची रांगोळी' ही एक लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतून कानिटकर कुटुंब आपल्या भेटीला येत. या कुटुंबामुळे आपल्याला एकत्र कुटुंब पुन्हा पाहायला मिळाले.

ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील किणीकर कुटुंबाचे कर्तेधर्ते दादा काका हे पात्र प्रेक्षकांच्या खूप जवळचे आहे. अभिनेते शरद पोंक्षे हे ही भूमिका साकारत आहेत. पण शरद पोंक्षे यांनी आता या मालिकेला रामराम केला आहे.

ठिपक्यांची रांगोळी ही मालिका गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आता या मालिकेतून शरद पोंक्षे यांनी एक्झिट घेतली आहे. स्टार प्रवाह वाहिनीने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शरद पोंक्षे यांनी याविषयी माहिती दिली आहे. (Latest Entertainment News)

Sharad Ponkshe Left Marathi Serial Thipkyanchi Rangoli
Baipan Bhari Deva Box Office Collection: 'बाईपण भारी देवा'चा मोठा कारनामा, आली शॉल्लिड गुड न्यूज

व्हिडीओमध्ये शरद पोंक्षे यांनी म्हटले आहे की, “गेली दोन वर्ष स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी ही माझी मालिका चालू होती. त्यात मी विनायक कानिटकर हे पात्र साकारत होतो. पण काही कारणांमुळे आणि पुढे घेतलेल्या काही प्रोजेक्टमुळे मी ठिपक्यांची रांगोळी या मालिकेसाठी फारसा वेळ देऊ शकणार नाही.

माझ्यामुळे त्या मालिकेचे नुकसान होऊ नये म्हणून ५०० भाग पूर्ण झाल्यावर मी ती मालिका सोडलेली आहे. माझ्या जागी माझा अत्यंत जवळचा मित्र आणि उत्तम अभिनेता उदय टिकेकर हे तुम्हाला विनायक कानिटकर ही भूमिका साकारताना दिसतील. तुम्ही मला जसं प्रेम दिलंत तसंच प्रेम उदय आणि त्याच्या व्यक्तीरेखेलाही द्याल अशी मला खात्री आहे. पुन्हा नवीन एखाद्या मालिकेतून किंवा नाटकातून भेटू.”

शरद पोंक्षे जरी या मालिकेत दिसणार नसले तरी ते विविध माध्यामातून आपल्या भेटीला येतील हे निश्चित. शरत पोंक्षे सोशल मीडियावर सक्रिय आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com