Baipan Bhari Deva Box Office Collection: 'बाईपण भारी देवा'चा मोठा कारनामा, आली शॉल्लिड गुड न्यूज

Baipan Bhari Deva 24th Day BO Collection : चित्रपटाच्या कलेक्शनचे आकडे शेअर केदार शिंदे यांनी आनंद व्यक्त केला आहे.
Baipan Bhari Deva 24th Day Box Office Collection
Baipan Bhari Deva 24th Day Box Office CollectionSaam TV
Published On

Kedar Shinde Share Good News : बाईपण भारी देवा या चित्रपटाचे संपुर्ण महाराष्ट्रात कौतुक होत आहे. या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवसेंदिवस वाढत आहे. चित्रपटाला प्रदर्शित होऊन २४ दिवस झाले आहे. इतके दिवस होऊनही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तग धरून आहे. तसेच पुढील अनेक दिवस हे चित्र बदलणार नाही.

केदार शिंदे यांनी नुकतीच या चित्रपटासंबंधित एक पोस्ट शेअर केली आहे. केदार शिंदे यांनी पोस्ट शेअर चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे अपडेट दिले आहेत.

Baipan Bhari Deva 24th Day Box Office Collection
Madhurani Gokhale Prabhulkar Post : अण्णा, तुम्ही दिलेली कौतुकाची थाप... अरुंधतीने पोस्ट शेअर करत जयंत सावरकरांच्या आठवणींना दिला उजाळा

केदार शिंदेंची पोस्ट

केदार शिंदे यांनी शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'ही तर श्री स्वामींची कृपा.. हा श्री सिद्धिविनायकाचा महाप्रसाद.. मराठी सिनेमाच्या इतिहासात याची नोंद घेतली जाईल. स्त्री घर चालवते तर, सिनेमा तर निश्चितच चालवू शकते. सैराटनंतरचा बाईपण ठरला महाराष्ट्राचा महासिनेमा...' (Latest Entertainment News)

चित्रपटाच्या कलेक्शनचे आकडे शेअर केदार शिंदे यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच ''आता थांबायचं नाय !'' असं देखील म्हटलं आहे. तसेच केदार शिंदे यांनी ही पोस्ट चित्रपटातील कलाकारांना टॅग देखील केली आहे.

सैराटचे हा मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासातील खूप मोठा चित्रपट आहे. त्यानंतर रितेश देशमुखच्या वेड चित्रपटाने बॉक्स ऑफिस अप्रतिम कमाई केली होती. आता बाईपण भारी देवा हा चित्रपट बॉक्स ऑफिस यशस्वी ठरला आहे. या चित्रपटाने ५० कोटींचा गल्ला पार केला असून आतापर्यंत ६५.६१ कोटींचे कलेक्शन केले आहे.

तर दुसरीकडे सिद्धार्थ जाधवचा 'अफलातून' चित्रपट या शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला देखील बॉक्स ऑफिसवर उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटानं एवढ्या दोन दिवसात २ कोटींच्यावर मजल मारली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com