Thief CCTV Video  Saam TV
मनोरंजन बातम्या

Thief CCTV Video : प्रसिद्ध दिग्दर्शिकेच्या घरी चोरी; दबक्या पावलांनी आला अन् पर्समधील पैसे चोरून पळाला, पाहा VIDEO

Thief Entering House Of Marathi Director Swapna Waghmare : फिल्मी स्टाइलने घरात प्रवेश करून चोरट्याने ६,००० रुपये चोरून पळ काढला आहे. ही संपूर्ण घटना घरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Ruchika Jadhav

मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शिका वाघमारे-जोशी यांच्या घरी चोरी झाली आहे. फिल्मी स्टाइलने घरात प्रवेश करून चोरट्याने ६,००० रुपये चोरून पळ काढला आहे. ही संपूर्ण घटना घरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, चोर बिल्डींगला असलेल्या पाईपच्या सहाय्यने घरात शिरला आहे. एका बेडरूमची खिडकी तोडून त्याने दबक्या पावलांनी आत प्रवेश केलाय. तो घरात सर्व बेडरूममध्ये जातो. नंतर तो किचनमध्ये प्रवेश करतो. काहीवेळाने त्याने थेट दिग्दर्शिकेच्या मुलीच्या बेडरूममध्ये प्रवेश केलाय. तसेच येथून त्याने पर्समधील ६ हजार रुपयांची कॅश घेऊन पळ काढला आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सदर घटना २५ ऑगस्ट रोजी पहाटे ३.३० च्या दरम्यान घडली आहे. घटना घडली त्यावेळी घरात दिग्दर्शिका, त्यांचे पती, आई, एक केअरटेकर आणि मुलगी-जावई इतक्या व्यक्ती होत्या. या घटनेनंतर दिग्दर्शिकेने आंबोली पोलिसात तक्रार नोंदवली आहे.

घडलेल्या घटनेबद्दल दिग्दर्शिकेने टाईम्स ऑफ इंडियाला एक मुलाखत देखील दिली आहे. आपल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या की, "सर्वांच्या बेडरूमध्ये चोर सुरूवातीला डोकावून पाहतो. मी ज्या बेडरूममध्ये झोपले होते तिथे एक कुत्रा सुद्धा होता. त्यामुळे कुत्र्याला पाहून चोर या बेडरूमध्ये आला नाही. त्यानंतर मुलगी आणि जावई झोपले होते त्या बेडरूमध्ये जाऊन त्याने पर्समधील पैसे चोरले. तिथे एक लॅपटॉप सुद्धा होता. मात्र पाईपवरून पुन्हा खाली जाताना त्याला अडचण आली असती, त्यामुळे त्याने तो कदाचित चोरला नसावा."

दिग्दर्शिकेच्या घरात एक मांजर सुद्धा आहे. चोराने घरात प्रवेश केला तेव्हा मांजरीने त्याला पाहिले होते. सीसीटीव्हीमध्ये सुद्धा मांजर दिसत आहे. चोरी करताना मांजर ओरडू लागते आणि दिग्दर्शिकेच्या जावयाला जग येते आणि तो चोर चोर म्हणून ओरडू लागतो, मात्र तितक्यात पाईपच्या सहाय्याने चोर तेथून पळून जातो, ही माहिती सुद्धा दिग्दर्शिकांनी आपल्या मुलाखतीत दिली. तसेच या घटनेमुळे त्यांच्या मनात भीती निर्माण झाल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

SCROLL FOR NEXT