Viral Video: गो गो गोविंदा... थरावर थर लावत दहीहंडी फोडण्यासाठी रणरागिणी जमल्या, महिला गोविंदा पथकाचा थरारक खेळ; VIDEO

Viral Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.ज्यात दादर परिसरात महिला दहिहंडी फोडताना दिसून येत आहे.सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Dahi Handi Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

सध्या सर्वत्र दहिहंडीचा उत्साह आपल्याला देशभरात पाहायला मिळत आहे. दहिहंडीच्या असो किंवा गणेशोत्सव या सणांची तयारी आपल्यालाकडे अनेक महिन्याअगोदरच करण्यास सुरुवात होते. मग त्यात दहिहंडीचा विषय येताच अनेक गोविंदा पथके आपल्याला पाहायला मिळतात. अगदी आठ- आठ थरांचे गोविंदा पथके पाहायला मिळतात,मग या गोविंदा पथकात आपल्याला अनेक महिलांचेही पथक पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर आजच्या दिवशीच्या व्हिडिओ पाहायला मिळत आहेत,ज्यात चक्क महिला पथकांनी दहीहंडी फोडण्याचा थरार केला आहे.

Dahi Handi Viral Video
Viral Video : बाप्पा आले....! धो धो पावसात लाडक्या बाप्पांचे आगमन; T20 वर्ल्डकप थीम असलेली गणेश मूर्ती पाहिलीत का? VIDEO

सध्या प्रत्येक क्षेत्रात महिला वर्गाची आघाडी असलेली आपल्याला पाहायला मिळतात. मग ते शिक्षण क्षेत्र असो कि स्पोर्ट क्षेत्रात आपल्याला दिसून येतात. मग आपण या दहिहंडीच्या सणात महिलावर्ग कसा काय पाठी राहिल. सध्या मुंबई शहरातही दहिहंडी फोडण्याचा उत्साह आपल्याला पाहायला मिळत आहे.मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ महिला वर्गातील आहे.जो व्हिडिओ दहिहंडी फोडतानाचा आहे.

व्हायरल (Viral)होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया एक्स प्लॅटफॉर्मवरील ''@ANI'' या अकाउटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ मुंबई शहरातील सर्वात प्रसिद्ध अशा दादरमधील आहे. व्हिडिओ व्हायरल होताच सकाळपासून मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि व्ह्यूजही व्हिडिओला मिळत आहेत. व्हिडिओ व्हायरल होताच अनेक प्रतिक्रिया व्हिडिओवर मिळत आहेत. या प्रत्येक यूजरने दहिहंडी फोडणाऱ्या महिलेचे कौतुक केले आहे.

व्हायरल व्हिडिओत काय?

व्हायरल व्हिडिओत(Video) तुम्हाला दादरमधील एक परिसर दिसून येत आहे. या व्हिडिओत पुढे काही महिला वर्ग दिसून येत आहेत. ज्यात काही महिला दहिहंडी फोडण्यासाठी एकत्र जमलेल्या आहेत. काही वेळात दहिहंडी फोडण्यासाठी या महिला थर करताना दिसून येत आहेत. एकमेंकीना सावरत या महिला शेवटी दहीहंडी फोडण्यात यशस्वी होताना आपल्याला दिसून येतात.

Dahi Handi Viral Video
Viral Video : बाप्पा आले....! धो धो पावसात लाडक्या बाप्पांचे आगमन; T20 वर्ल्डकप थीम असलेली गणेश मूर्ती पाहिलीत का? VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com