श्रावण महिना सुरु होऊन काही महिने उलटले आहेत. श्रावण महिना सुरु झाल्यानंतर महाराष्ट्रासह सर्वत्र अनेक सण-उत्सव साजरे होताना दिसत आहेत.त्यात अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. गणेशोत्सव म्हटलं की, प्रत्येक व्यक्तीमध्ये गणेशोत्सवाची मोठ्या प्रमाणात लगबग दिसून येते,जर हे गणेशोत्सव जर मुंबईतील असतील तर आपल्याला भल्या मोठ्या गणपती बाप्पाच्या मुर्त्या पाहायला मिळतात.विविध पद्दतीच्या थीमही पाहायला मिळतात,सध्या गणेशोत्सव संबंधित एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे,ज्यात गणपती बाप्पाची सर्वांच्या आवडतीच्या थीमची मुर्ती पाहायला मिळतेय.
सध्या मुंबई शहरासह अनेक उपनगरात गणेशोत्सवापूर्वीच गणपती बाप्पाचे आगमन(arrival) सोहळे पार पडत आहेत. आपल्याला या आगमन सोहळ्यात अनेक भल्यामोठ्या मुर्ती दिसून येत आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या गणपती बाप्पाची मुर्ती ही ' T20वर्ल्ड कप'च्या थीमवर आधारित आहे.
या वर्षी वर्ल्ड कपची चर्चा अथ्या जगभर पाहायला मिळाली. लहान मुलांपासून ते मोठ्या पर्यंत T20 वर्ल्ड कपचा (T20)जोश अगदी वेगळा असा होता. ज्या क्षणी वर्ल्ड कप आपल्या भारतीय खेळांडूनी जिंकला तो क्षण आपल्या सर्वांसाठी एक अभिमानाचा असा होता.T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मुंबई शहरात भारतीय खेळाडू आल्यानंतर एक बस रॅली पार पडली.
त्याचे अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहिले.मात्र T20 वर्ल्ड कप जिंकल्याचा क्षण अजूनही भारतीयांच्या मनात राहिलेला आहे.जो आपल्याला गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्यातील मुर्तीमधून दिसून आला. ज्यात गणपत्ती बाप्पाची मुर्ती 'T20वर्ल्ड कप'च्या संपूर्ण थीमवर आधारित आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओचे फोटो आपल्याला ''@CricCrazyJohns'' या अकाउंटवर पाहता येऊ शकतात शिवाय गणपती बाप्पाचा हा व्हिडिओ तुम्हाला ''Ganpati shorts''या युट्युब अकाउंटवर पाहता येईल.व्हायरल व्हिडिओ मुंबईतील असून गणपत्ती बाप्पाचे(ganpati bappa) आगमन होताना दिसून येत आहे.
आगमन सोहळ्याला मुंबईकरांची मोठ्या प्रमाणात गर्दीही पाहायला मिळत आहे. शिवाय एक गणपती बाप्पाची मुर्ती दिसून येतेय मात्र गणपती बाप्पाच्या बाजूला असलेल्या उंदीर मामाच्या हातात एक वर्ल्ड कपची ट्रॉफी दिसून येत आहे. बाप्पाचे आगमन होतान अनेकजण आपल्या मोबाईलमधून व्हिडिओ काढत आहेत तर अनेकजण फोटो काढताना दिसून येत आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.