PM Modi वर्ल्ड कप घेताना रोहितचा जबराट डान्स; हटके स्टेप्सने पीएम मोदींचंही लक्ष वेधलं, पाहा व्हिडिओ

Team India Meet PM Modi: T20 विश्वचषकाची ट्रॉफी स्वीकारतान भारतीय कर्णधार रोहित शर्माने केलेल्या डान्सनं पीएम मोदींचं लक्ष वेधलंय. स्वत: पंतप्रधान मोदींनी रोहितला या डान्समागील कारण विचारलं.
PM Modi : वर्ल्ड कप घेताना रोहितचा जबराट डान्स; हटके स्टेप्सने पीएम मोदींचंही लक्ष वेधलं, पाहा व्हिडिओ
Team India Meet PM Modicricxtasy
Published On

दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत भारतीय क्रिकेट संघाने टी २० वर्ल्डकप जिंकला. हा विश्वकप घेताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने अगळा वेगळा डान्स केला होता. रोहितचा हा डान्सची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली. आता खुद्द पंतप्रधान मोदींनी त्याची विचारणा केली. असा डान्स करण्यामागे कारण काय असा प्रश्न पंतप्रधान मोदींनी रोहित शर्माला विचारला.

यूएसए आणि कॅरिबियनमध्ये झालेल्या T20 विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाने विजेतेपद पटकावलं. या विजेत्या संघाने पंतप्रधान मोदींची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींनी टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत मनमोकळ्या गप्पा केल्या. पंतप्रधान मोदींनी संघाच्या या वर्ल्डकपमधील प्रवासाचा अनुभव जाणून घेतला.

याचदरम्यान पंतप्रधान मोदींनी रोहितला त्याच्या डान्सवर प्रश्न केला. भारतीय संघाने जेव्हा सामना जिंकला तेव्हा विश्वकप स्वीकारताना रोहित शर्माने एक अगळा वेगळा डान्स केला. या डान्सची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली. इतकेच खुद्द पंतप्रधान मोदींनी या डान्सची विचारणा केली. विश्वकप जिंकल्यानंतर रोहित शर्माच्या अनेक भावना आपण पाहिल्या. त्या इतर भारतीयांनाही दिसल्या. पण त्याचवेळी मी रोहितचा तुझा डान्स पाहिला.

याचं कारण काय होतं असा प्रश्न मोदींनी रोहित शर्माला या संवादादरम्यान विचारला. यावर उत्तर देताना रोहित म्हणाला, "सर, हा एक दिवस होता ज्याची आम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होतो, त्यामुळे मला माझ्या टीममेट्सनी सांगितले होते की तुम्ही साधे चालत जाऊन कप घ्यायला नको. ट्रॉफी स्वीकायरला जातांना काहीतरी वेगळं केलं पाहिजे त्यामुळे असा डान्स केल्याचं रोहित म्हणाला. मग या डान्समागे युजवेंद्र चहलची आयडिया होती का? दुसरा प्रश्न पंतप्रधान मोदींनी केला. यामागे ही आयडिया चहल आणि कुलदीप या दोघांची होती, असं रोहित म्हणाला.

PM Modi : वर्ल्ड कप घेताना रोहितचा जबराट डान्स; हटके स्टेप्सने पीएम मोदींचंही लक्ष वेधलं, पाहा व्हिडिओ
Ajit Pawar On Team India: जिंकल्यावर उदो उदो होतो, हरलो तर लोक दगडंही मारतात; टीम इंडियासमोर अजित पवारांची फटकेबाजी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com