आयपीएल २०२४ मध्ये राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युजवेंद्र चहल दमदार कामगिरी केलीय. चहल हा या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. चहलने आयपीएल २०२४ मध्येही आपल्या अप्रतिम गोलंदाजीने फलंदाजांना हैराण केले आहे. चहल आयपीएल २०२४ च्या पंजाब किंग्स विरुद्धच्या २७ व्या सामन्यात मोठं विक्रम करणार आहे. चहल अनोखे द्विशतक पूर्ण करण्यापासून तो फक्त 3 पावले दूर आहे. आजपर्यंत कोणत्याही खेळाडूला आयपीएलमध्ये अशी कामगिरी करता आलेली नाहीये.
२०१३ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करणारा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलने आतापर्यंत आयपीएलमध्ये १९७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने १५० सामन्यांमध्ये या विकेट घेतल्यात. तो आयपीएलमध्ये २०० विकेट्स पूर्ण करण्यापासून फक्त ३ पावले दूर आहे. चहल पंजाब किंग्सविरुद्ध ही कामगिरी करू शकतो. ३ विकेट्स घेऊन तो आयपीएलमध्ये २०० बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरणार आहे. आयपीएलमध्ये चहलच्या नावावर ६ वेळा ४ विकेट्स घेण्याचा आणि त्यानंतर १ वेळा ५ विकेट घेण्याचा विक्रम आहे.
आयपीएल २०२४ मध्येही चहलने आतापर्यंत शानदार गोलंदाजी केलीय. चहल पर्पल कॅपच्या शर्यतीत कायम आहे. जसप्रीत बुमराहनंतर या मोसमात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत चहल दुसऱ्या स्थानावर आहे. बुमराह आणि चहल या दोघांनी ५ सामने खेळताना प्रत्येकी १० बळी घेतले आहेत. या काळात बुमराहचा इकॉनॉमी रेट ५.९५ आहे, तर चहलचा इकॉनॉमी रेट ७.३३ आहे. चहलची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ३/११ अशी आहे. चहलनंतर आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा ड्वेन ब्राव्हो आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्सकडून अनेक आयपीएल सामन्यात खेळलाय.
ब्राव्होने २०२२ पर्यंत आयपीएलचे १६१ सामने खेळले असून यात त्याने १८३ बळी घेतलेत. त्यांच्यानंतर भारतीय फिरकीपटू पियुष चावला आहे. चावलाने १८५ सामन्यात १८१ विकेट घेतल्यात. या यादीत चौथे नाव अमित मिश्राचे आहे. अमित मिश्राने १६१ सामन्यात १७३ विकेट घेतल्या आहेत. तर पाचव्या क्रमांकावर भुवनेश्वर कुमारचे नाव आहे. भुवनेश्वर कुमारने १६५ सामन्यात १७३ विकेट घेतल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.