Priyanka Chopra Birthday Instagram @priyankachopra
मनोरंजन बातम्या

Priyanka Chopra Birthday : १८ व्या वर्षीच मिळवला 'मिस इंडिया आणि 'मिस वर्ल्ड'चा किताब, बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत प्रियांका चोप्राची क्रेझ कायम

Chetan Bodke

बॉलिवूड आणि हॉलिवूड गाजवणाऱ्या 'देसी गर्ल'चा म्हणजेच प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) हिचा आज (१८ जुलै) ४२ वा वाढदिवस (Priyanka Chopra Birthday) आहे. तिने वयाच्या १८ व्या वर्षी 'मिस इंडिया' आणि 'मिस वर्ल्ड'चा किताब जिंकली आणि तिच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली. प्रियंकाचा जन्म १८ जुलै १९८२ मध्ये जमशेदपूरमध्ये झाला. आज प्रियंकाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या फिल्मी करियरबद्दल जाणून घेऊया...

प्रियंकाला बालपणापासून मानसोपचारतज्ज्ञ होण्याची इच्छा होती. प्रियंकाने 'मिस इंडिया' आणि 'मिस वर्ल्ड'चा किताब २००० मध्ये जिंकला. त्यावर्षी ती १८ वर्षांची होती. हे दोन्हीही किताब तिच्या नावावर झाले आणि तिला एक वेगळीच ओळख प्रस्थापित झाली. प्रियांकाने आज बॉलिवूडमध्ये जरीही आपलं नाव कमावलं असलं तरीही तिने, तामिळ चित्रपटातून आपल्या फिल्मी करियरची सुरूवात केली. तिचा पहिला चित्रपट 'थमिजहन' हा होता. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत, विजय दलपती सुद्धा होता. हा चित्रपट २००२ मध्ये रिलीज झाला होता. त्यानंतर तिने २००३ मध्ये रिलीज झालेल्या, 'द हिरो : लव्हस्टोरी ऑफ अ स्पाय' चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केले. यामध्ये तिने सनी देओलसोबत काम केले.

त्यानंतर मग प्रियांका 'अंदाज', 'मुझसे शादी करोगी', 'ऐतराज' सह अनेक चित्रपटांतून ती प्रमुख भूमिकेमध्ये दिसली. प्रियांकाला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली, 'ऐतराज'मुळे. तेव्हापासून ते आजवर प्रियांकाने मागे वळूनही पाहिले नाही. त्यानंतर प्रियांकाला 'क्रिश' आणि 'डॉन' या दोन बहुचर्चित चित्रपटांमुळे विशेष प्रसिद्धी मिळाली. त्याशिवाय, 'फॅशन'मध्येही प्रियांका मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटामध्ये तिने कंगना रणौतसोबत स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटामध्ये कंगनाने एका फॅशन मॉडेलचे पात्र साकारले आहे. या चित्रपटासाठी प्रियांकाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. या चित्रपटामुळे तिच्या करियरला कलाटणी मिळाली असून त्यानंतर तिने अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे.

२०१६ साली प्रियंकाने हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. प्रियंका चोप्रा हॉलिवूडमध्ये मुख्य भूमिका करणारी पहिली बॉलिवूड नायिका ठरली. प्रियंका चोप्राने २०१८ मध्ये निक जोनाससोबत लग्नबंधनात अडकली. सध्या ती पतीसोबत आणि लेक मालतीसोबत अमेरिकेत आहे. हॉलिवूड डेब्यू केल्यानंतर प्रियंका बॉलिवूड गाजवतेय. २०२३ मध्ये रिलीज झालेल्या 'सिटाडेल' सीरीजमध्ये तिने अ‍ॅक्शन भूमिका साकारली होती. शिवाय, २०१६ मध्ये रिलीज झालेल्या, राजेश म्हापुसकर दिग्दर्शित 'व्हेंटिलेटर' चित्रपटामध्येही ती मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटामध्ये प्रियंकाने 'बाबा जाऊ नको तू' हे गाणं गायलं आहे. या गाण्यामध्ये ती अगदी अस्खलित मराठी बोललेली आहे. लवकरच एका बॉलिवूड चित्रपटामध्येही दिसण्याची शक्यता आहे.

प्रियंका चोप्राची एकूण संपत्ती ६२० कोटींच्या आसपास आहे. एका चित्रपटासाठी प्रियंका १२ कोटी रुपये आकारते. तर एका इन्स्टा पोस्टसाठी अभिनेत्री तीन कोटी रुपये घेते. प्रियंकाचं एक मुंबईत आलिशान घर आहे. या घराची किंमत सात कोटी रुपये आहे. लॉस एंजलिसमधील तिच्या घराची किंमत 238 कोटी रुपयांच्या आसपास आहे. तसेच तिच्याकडे अनेक महागड्या गाड्यादेखील आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT