Urvashi Rautela Video : उर्वशी रौतेलाचा बाथरूम व्हिडिओ व्हायरल, इंटरनेट विश्वात खळबळ, VIDEO खरा की खोटा?
भारतीय क्रिकेट संघाचा युवा खेळाडू रिषभ पंत याच्यासोबत नाव जोडल्यानंतर उर्वशी रौतेला बरीच चर्चेत आली होती. त्यानंतर काही ना काही कारणांनी तिची चर्चा होतच असते. पण आता एका वेगळ्याच कारणानं इंटरनेट विश्वात खळबळ उडाली आहे. उर्वशीचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तो व्हिडिओ बघून सगळेच हैराण झाले आहेत. पण तो व्हिडिओ खरा की खोटा या चर्चेनं सोशल मीडियाचं विश्व ढवळून निघालंय.
उर्वशी रौतेला बाथरूममध्ये आंघोळीला जातानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळं इंटरनेटच्या जगात भूकंपच झाला आहे. हा व्हिडिओ मानव मंगलानीच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. पण हा व्हिडिओ बघून नेटकऱ्यांच्या मनात शंकेची पालही चुकचुकली आहे.
अभिनेत्री उर्वशी रौतेला बाथरूममध्ये आंघोळीला जाताना या व्हायरल व्हिडिओत दिसतेय. काही सेकंदांचा हा व्हिडिओ आहे. दुसरीकडे हा व्हिडिओ लीक झाला आहे की, एखाद्या चित्रपटातील दृश्य आहे याबाबत अद्याप कुठूनही नेमकी माहिती आलेली नाही. तर उर्वशीकडूनही अद्याप त्यावर काहीही प्रतिक्रिया आली नाही.
नेटकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न
सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. तो व्हिडिओ लीक झालाय की मुद्दामहून व्हायरल करण्यात आलाय, असा प्रश्न काही नेटकऱ्यांना पडला आहे. इतक्या साध्या बाथरूममध्ये असे लोक जात नसतात, अशी प्रतिक्रिया देत शंका उपस्थित केली आहे. तर हा एखाद्या चित्रपटातील सीन अशू शकतो, असंही काहींचं म्हणणं आहे. दुसरीकडे प्रमोशनाची ही पद्धत नेहमीचीच झाली आहे, असं म्हणत खिल्लीही उडवण्याचा काहींनी प्रयत्न केला आहे.
उर्वशी रौतेला नेहमीच चर्चेत असते. तिने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नुकतीच ती जेएनयू या सिनेमात झळकली होती. हा चित्रपट या वर्षीच प्रदर्शित झाला होता. दिल है ग्रे हा हिंदी सिनेमा आणि ब्लॅक रोज या तेलुगू सिनेमातही ती दिसणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

