Urvashi Rautela: ऋषभ पंतमुळे पुन्हा ट्रोल झाली उर्वशी रौतेला, नेमकं कारण काय?; अभिनेत्रीने ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर

Urvashi Rautela Trolled: उर्वशी आणि रिषभ या दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नाव न घेता एकमेकांवर जोरदार टीका केली. आता उर्वशी रौतेला पुन्हा एकदा ऋषभ पंतसोबत तिच्या नवीन मॅट्रिमोनियल ब्रँडच्या जाहिरातीमुळे वादात सापडली आहे.
Urvashi Rautela Trolled
Urvashi Rautela TrolledSaam Tv

Urvashi Rautela Trolled Over Rishabh Panth:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आणि मॉडेल उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्वशी रौतेलाचे नाव अनेकदा टीम इंडियाचा बॅट्समन ऋषभ पंतसोबत जोडले गेले आहे. गेल्या काही वर्षांपासून ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. जेव्हा उर्वशीने आरपी म्हणत एक मुलाखत दिली होती. तेव्हा ऋषभ पंतने याला पब्लिसिटी स्टंट म्हटले होते. तेव्हापासून या दोघांमध्ये तणाव निर्माण झाला. यानंतर दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नाव न घेता एकमेकांवर जोरदार टीका केली. आता उर्वशी रौतेला पुन्हा एकदा ऋषभ पंतसोबत तिच्या नवीन मॅट्रिमोनियल ब्रँडच्या जाहिरातीमुळे वादात सापडली आहे.

ऋषभ पंतचे चाहते देखील काहीवेळा उर्वशी रौतेलाला ट्रोल करतात. त्यामुळे तिला खूप त्रास सहन करावा लागतो. नुकताच असं घडलं की, जेव्हा एका कथित जाहिरातीवरून ट्रोलर्सनी उर्वशी रौतेलाला लक्ष्य केले. त्यानंतर उर्वशीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले. या जाहिरातीनंतर उर्वशी रौतेला ऋषभ पंतच्या हाइटची मस्करी करत असल्याचे नेटकऱ्यांना वाटले. त्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे. अशामध्ये उर्वशीने इन्स्टाच्या स्टोरीवर भली मोठी पोस्ट लिहित स्पष्टिकरण दिले आणि ट्रोलर्सला उत्तर देखील दिले.

IANS च्या वृत्तानुसार, मेट्रोमोनिअल ब्रँडच्या जाहिरातीमुळे वादात सापडलेली अभिनेत्री उर्वशी रौतेलाने स्पष्टीकरण दिले असून जाहिरातीत तिने जे काही सांगितले आहे ते स्क्रिप्टचा भाग असल्याचे सांगितले आहे. अभिनेत्री अलीकडेच एका मॅट्रिमोनिअल ब्रँडच्या जाहिरातीत दिसली. व्हिडिओमध्ये उर्वशी अभिनेते, उद्योगपती, गायक आणि क्रिकेटर्सबद्दल बोलताना दिसत आहे. उर्वशी म्हणते की, 'मी अनेक लोकांना भेटले, ज्यात उद्योगपती, अभिनेते आणि काही क्रिकेटर्स आहेत. असे अनेक आहेत जे माझ्या उंचीचे नाहीत.'

उर्वशी रौतेलाची ही जाहिरात पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याचा संबंध थेट ऋषभ पंतशी लावला. उर्वशीने नाव न घेता व्हिडिओमध्ये भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतची खिल्ली उडवल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला. आता या अभिनेत्रीने ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले आहे. सोमवारी, उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, 'ही ब्रँडने दिलेली सामान्य स्क्रिप्ट आहे. हा कोणाकडेही इशारा नाही.. सकारात्मक गोष्टी पसरवा. मला माहिती आहे की ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून त्याचा लोकांवर काय परिणाम होऊ शकतो.'

Urvashi Rautela Trolled
Crew Box Office Collection Day 4: पहिला सोमवार 'क्रू'साठी ठरला फायदेशीर, चौथ्या दिवशीही केली जबरदस्त कमाई

उर्वशी रौतेलाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सध्या उर्वशी यो यो हनी सिंगसोबत 'लव्ह डोस 2.0' च्या यशाचा आनंद घेत आहे. ती सध्या 'जहांगीर' या प्रोजेक्टची तयारी करत आहे. लवकरच ती 'जेएनयू' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट याच महिन्यात रिलीज होणार आहे. उर्वशीच्या हातामध्ये अक्षय कुमारचा 'वेलकम 3', बॉबी देओल, दुल्कर सलमान, नंदामुरी बालकृष्णाचा 'NBK109', सनी देओल आणि संजय दत्तचा 'बाप' आणि रणदीप हुड्डाचा 'इंस्पेक्टर अविनाश 2' हे चित्रपट आहेत.

Urvashi Rautela Trolled
Ajay Devgn Networth: अजय देवगणचे खरे नाव तुम्हाला माहितीये?, दिसण्यावरून मिळायचे टोमणे; आज आहे कोट्यवधीचा मालक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com