Crew Box Office Collection Day 4: पहिला सोमवार 'क्रू'साठी ठरला फायदेशीर, चौथ्या दिवशीही केली जबरदस्त कमाई

Crew Movie Worldwide Collection Day 4: ओपनिंग डेलाच या चित्रपटाने सुरूवात चांगली केली. आता या चित्रपटाची चौथ्या दिवसाची कमाई समोर आली आहे. या चित्रपटासाठी पहिलाच सोमवार देखील चांगला ठरला आहे.
Crew Movie
Crew Movie Saam Tv

Crew Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor), क्रिती सेनॉन (Kriti Senon) आणि तब्बू स्टारर 'क्रू' चित्रपटाची (Crew Movie) बॉक्स ऑफिसवर जादू पाहायला मिळत आहे. या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच वेग पकडला आहे. दिवसेंदिवस हा चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे. ओपनिंग डेलाच या चित्रपटाने सुरूवात चांगली केली. आता या चित्रपटाची चौथ्या दिवसाची कमाई (Crew Box Office Collection Day 4) समोर आली आहे. या चित्रपटासाठी पहिलाच सोमवार देखील चांगला ठरला आहे.

या चित्रपटामध्ये करीना, क्रिती आणि तब्बू या तिघी मुख्य भूमिकेत आहेत. या तिघींच्याही अभिनयावर प्रेक्षक भरभरून प्रेम देताना दिसत आहेत. या तिघीही चित्रपटगृहावर चांगलेच वर्चस्व निर्माण केले आहे. या चित्रपटातील तिघींचा अभिनय आणि चित्रपटाची कथा प्रेक्षकांना आवडत आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी येत आहेत. ज्याचा फायदा निर्मात्यांना होताना दिसत आहे.

वीकेंडमध्ये 'क्रू' चित्रपटाने देशभरात भरपूर पैसे छापले. शनिवारी या चित्रपटाने 9.75 कोटींची कमाई केली. त्याचवेळी या चित्रपटाने रविवारी 10.5 कोटी रुपयांची कमाई केली. Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, करीना कपूर, क्रिती सेनॉन आणि तब्बू यांच्या 'क्रू' चित्रपटाने चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी 4.50 कोटींचा व्यवसाय केला. अशा प्रकारे देशभरात चित्रपटाची एकूण कमाई 34 कोटी रुपयांच्या आसपास पोहचली आहे.

Crew Movie
Kapil Sharma Birthday: टेलिफोन बुथवर काम ते प्रसिद्ध कॉमेडीयन, जाणून घ्या कॉमेडीयन कपिल शर्माचा खडतर प्रवास

करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनॉनचा 'क्रू' चित्रपट जगभरात देखील चांगले कलेक्शन करताना दिसत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 20.7 कोटी रुपये आणि दुसऱ्या दिवशी 20.43 कोटी रुपयांचे वर्ल्डवाइड कलेक्शन केले. तर तिसऱ्या दिवशी 'क्रू' चित्रपटाने 21.40 रुपयांचा गल्ला जमा केला. अशा प्रकारे या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 62.53 कोटींची कमाई केली आहे.

Crew Movie
Remo D'Souza Birthday: वडिलांचा इच्छा होती पायलट व्हावं, मात्र रेमो डिसुझाने पाय जमिनीवर ठेवत घेतली गगन भरारी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com