आपल्या कॉमेडीसोबतच आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर छाप पाडणाऱ्या कपिल शर्माची लोकप्रियता फक्त भारतातच नाही तर परदेशातही आहे. कपिल शर्मा हे नाव छोट्या मुलांपासून थोरा मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच तोंडी कायम असतं. आज २ एप्रिल, कपिल शर्माचा वाढदिवस. कपिल शर्माचा एक लोकप्रिय अभिनेता आणि एक लोकप्रिय कॉमेडियन होण्यापर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. कपिल शर्माच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्या सिनेकरियरबद्दल...
कपिलचा जन्म २ एप्रिल १९८१ रोजी पंजाबमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. कपिलचे वडील हे पोलीस अधिकारी होती. त्यांचे २००४ साली कॅन्सरमुळे निधन झाले. वडिलांच्या जाण्याने अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी कपिलवर पडली. कपिलला वडिलांची नोकरी मिळत होती, मात्र कपिलने ती संधी नाकारली. आपल्यावर अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी आल्याने, आपली सर्व स्वप्ने बाजूला टाकत घर चालवण्यासाठी टेलिफोन बुथवर ५०० रूपये रोजाने काम करू लागला. तर कधी कपड्याच्या गिरणीमध्ये तर कधी भजन गाण्याचे कामही कपिलने केले. (Bollywood Actor)
२००८ मध्ये कपिलच्या करियरला कलाटणी मिळाली. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कॉमेडी शोचा कपिल विजेता ठरला. त्याच्या आयुष्यातला हा पहिलाच शो होता. तेव्हापासून कपिलने एकदाही मागे वळून न पाहता आपल्या यशाचा आलेख कायम चढता ठेवला. (Bollywood News)
कपिलने आपल्या करिअरमध्ये एकदा नाही दोनदा नाही तर सहा वेळा ‘कॉमेडी नाईट्स’चे विजेतपद आपल्या नावावर केले. त्याचा हा हटके रेकॉर्ड आतापर्यंत कोणीही तोडू शकलं नाही. कपिलने आजवर मोजक्याच चित्रपटात काम केले आहे. कपिलला त्याच्या विनोदी शैलीमुळे ‘द कपिल शर्मा शो’ होस्ट करण्याची संधी मिळाली. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.