71 व्या मिस वर्ल्डच्या (Miss World 2024) विजेत्याची घोषणा शनिवारी रात्री करण्यात आली. मुंबईमध्ये हा सोहळा पार पडला. चित्रपट निर्माते आणि सेलिब्रिटी टॉक शो होस्ट करण जोहरने विजेत्याची घोषणा केली. झेक रिपब्लिकच्या क्रिस्टीना पिजकोव्हा मिस वर्ल्डची विजेती ठरलीय. करण जोहरेने मिस वर्ल्डचा मुकट विजेती क्रिस्टीना पिजकोव्हाला दिला. भारतासह 112 देशांतील मॉडेल्सना पराभूत करून क्रिस्टिना पिजकोव्हाने मिस वर्ल्ड 2024 चा ताज जिंकला. भारताचे प्रतिनिधित्व सिनी शेट्टीने केले होते.
यंदा मुंबईत 71 व्या मिस वर्ल्डचे आयोजन करण्यात आले होते. 28 वर्षांनंतर पुन्हा एकदा भारताने मिस वर्ल्ड सोहळ्याच्या आयोजनाची जबाबदारी स्वीकारली. यापूर्वी 1996 मध्ये बंगळुरूमध्ये ही सौंदर्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. भारतीय चाहत्यांसाठी सर्वात मोठा धक्का हा होता की ही स्पर्धा भारतात होत असूनही भारताला विजेतेपदापासून वंचित राहावे लागले. भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुंदर मॉडेल सिनी शेट्टीने 112 पैकी टॉप 40 मध्ये स्थान मिळवले. तेव्हा भारतीयांना सिनीच्या विजयाच्या आशा वाढल्या होत्या. ती टॉप 8 मध्ये पोहोचल्यावर तिला एक प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नामुळेच ती मिस वर्ल्डचा किताब जिंकण्यापासून दूर राहिली.
टॉप 8 मध्ये विचारलेल्या प्रश्नाचे सिनीने दिलेले उत्तर जजला प्रभावित करू शकले नाही आणि परिणामी सिनीला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. सिनी शेट्टीला विचारण्यात आले होते की, 'सोशल मीडिया महिलांच्या सक्षमीकरणासाठी कशी मदत करू शकते? सिनीने उत्तर दिले की, सोशल मीडियामध्ये जग बदलण्याची ताकद आहे आणि त्यामुळे विविध क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत आहे. सोशल मीडिया जगाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो.'
IANS च्या अहवालानुसार, ग्रँड फिनाले हा स्टार-स्टड इव्हेंट ठरला कारण त्यात बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन, पूजा हेगडे या दोघीही जजच्या पॅनेलमध्ये होत्या. मानुषी छिल्लरने 2017 मध्ये मिस वर्ल्डचा ताज मिळवला होता. मानुषी छिल्लरसोबत सोनाक्षी सिन्हा देखील या शोमध्ये सहभागी झाली होती. तसेच हिंदी पॉप स्टार शान आणि नेहा आणि टोनी कक्कर यांनी या शोमध्ये उत्कृष्ट परफॉर्मन्स दिला. संजय लीला भन्साळी यांच्या आगामी वेब सिरीज 'हिरामंडी: द डायमंड बझार' च्या मुख्य अभिनेत्री मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, संजीदा शेख आणि शर्मीन सहगल यांनी या शोमध्ये परफॉर्मन्स दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.