Oscar Awards 2024 : अवघ्या काही तासांमध्येच होणार ऑस्कर अवॉर्डची घोषणा, कधी आणि कुठे पाहायला मिळणार लाइव्ह शो?

Oscar Awards 2024 Update: भारतामध्ये ऑस्कर अवॉर्ड शोला ११ मार्च रोजी म्हणजे सोमवार पहाटे ४ वाजता सुरुवात होणार आहे. या शोची सुरुवात एका ग्रँड रेड कार्पेट सोहळ्याने होणार आहे. त्यानंतर या अवॉर्ड सोहळ्याला सुरूवात होईल.
Oscar Awards 2024
Oscar Awards 2024Saam Tv
Published On

Oscar Awards 2024 Live Show:

96 व्या ऑस्कर अवॉर्डच्या (Oscar Awards 2024) विजेत्यांची घोषणा होण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. ऑस्कर अवॉर्डकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा अवॉर्ड असणाऱ्या ऑस्करची प्रत्येकाला प्रतीक्षा असते. एकीकडे चाहते आपल्या देशातील कलाकारांना सपोर्ट करण्यात व्यस्त आहेत, तर दुसरीकडे चित्रपटसृष्टीशी संबंधित लोकं ऑस्कर पुरस्कार जिंकण्याचे स्वप्न घेऊन या अवॉर्ड शोची आतुरतेने वाट पाहत आहेत. तुम्हीही 96 व्या ऑस्कर अवॉर्ड्सची वाट पाहत असाल आणि हा शो तुम्हाला लाइव्ह पाहायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला भारतात कधी आणि कुठे हा शो पाहायला मिळणार हे आज आपण जाणून घेणार आहोत...

भारतामध्ये ऑस्कर अवॉर्ड शोला ११ मार्च रोजी म्हणजे सोमवार पहाटे ४ वाजता सुरुवात होणार आहे. या शोची सुरुवात एका ग्रँड रेड कार्पेट सोहळ्याने होणार आहे. त्यानंतर या अवॉर्ड सोहळ्याला सुरूवात होईल. यावर्षी हा शो जिमी किमेल होस्ट करणार आहे. मागच्या वर्षी देखील त्याने हा शो होस्ट केला होता. जिमी किमेल हा अवॉर्ड शो होस्ट करण्याची ही चौथी वेळ असणार आहे. भारतामध्ये टीव्ही चॅनल स्टार मूव्हीज आणि OTT प्लॅटफॉर्म Disney+ Hotstar वर सकाळी 4 वाजल्यापासून ऑस्कर अवॉर्ड्स लाइव्ह स्ट्रीम होईल. तसंच, IST रात्री 8:30 वाजता स्टार मूव्हीजवर देखील पुन्हा प्रसारित होईल. 2024 मध्ये भारताच्या RRR चित्रपटातील 'नाटू-नाटू' या गाण्याने ऑस्कर अवॉर्ड जिंकला होता.

Oscar Awards 2024
Shaitaan Box Office Day 2: अजय देवगणच्या 'शैतान'ने कमाईमध्ये घेतली उंच उडी, 2 दिवसांत केलं इतकं कलेक्शन

याशिवाय, मागच्या वर्षीच 'द एलिफंट व्हिस्पर्स' या भारतीय डॉक्युमेंट्रीलाही सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्रीचा ऑस्कर मिळाला होता. भारतातील एका सत्य घटनेवर आधारित ‘टू किल अ टायगर’ ही डॉक्युमेंट्री ऑस्कर 2024 साठी नामांकित झाली आहे. ज्याचे दिग्दर्शन निशा पाहुजा यांनी केले आहे. 'टू किल अ टायगर'बद्दल प्रत्येक भारतीय खूप उत्सुक आहे. ही डॉक्युमेंट्री झारखंडमधील एका कुटुंबाच्या जीवनावर आधारित आहे. जे त्यांच्या किशोरवयीन मुलीवर झालेल्या क्रूर बलात्कारानंतर न्यायासाठी मोहीम राबवत आहेत. प्रियांका चोप्रा जोनास, देव पटेल आणि मिंडी कलिंग हे नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

Oscar Awards 2024
कोण आहे मॅक्सटर्न उर्फ Sagar Thakur?, Elvish Yadav ने केली होती मारहाण; VIDEO व्हायरल

ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित ओपेनहाइमर सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी ऑस्कर अवॉर्ड जिंकू शकेल आणि त्याचा मुख्य अभिनेता किलियन मर्फी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर अवॉर्ड जिंकू शकेल अशी अपेक्षा आहे. ओपनहायमरला 13 श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे. दुसरीकडे, योर्गोस लॅन्थिमोसच्या 'पुअर थिंग्ज'ला 11 नामांकन मिळाले आहेत. त्यानंतर मार्टिन स्कोर्सेसच्या 'किलर्स ऑफ द फ्लॉवर मून'ला 10 श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे. सर्वोत्कृष्ट चित्र श्रेणीमध्ये 'ओपेनहाइमर', 'अमेरिकन फिक्शन', 'ॲनाटॉमी ऑफ अ फॉल', 'बार्बी', 'द होल्डओव्हर्स', 'मेस्ट्रो', 'पास्ट लाइव्ह्स', 'किलर्स ऑफ द फ्लॉवर मून' आणि 'द झोन ऑफ इंटरेस्ट' या चित्रपटांचा समावेश आहे.

Oscar Awards 2024
Miss World 2024 स्पर्धा हारल्यानंतर खूप रडली Sini Shetty, इमोशनल VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com