Tharla Tar Mag Serial Promo Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tharla Tar Mag: साक्षीचा गुन्हा सर्वांसमोर उघड होणार? 'ठरलं तर मग' मालिकेचा नवा प्रोमो आऊट

Tharla Tar Mag Serial Promo: 'ठरलं तर मग' मालिका रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. मालिकेत आता लवकरच साक्षीचा गुन्हा सर्वांसमोर उघड होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी मालिकाविश्वातील ठरलं तर मग ही लोकप्रिय मालिका आहे. मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट येत आहेत. मालिकेत सध्या सायली-अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट संपले आहे. परंतु मधुभाऊंची केस संपेपर्यंत त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. मालिकेत आता लवकरच साक्षीचे सत्य कोर्टासमोर उघडं होणार आहे. त्यामुळे साक्षीला शिक्षा मिळणार आहे.

ठरलं तर मग मालिकेचा नवीन प्रोमो प्रदर्शित झाला आहे. मालिकेतील नवीन प्रोमोत साक्षीला शिक्षा होताना दिसणार आहे. मालिकेच्या नवीन प्रोमोत मधुभाऊंच्या केसची सुनावणी कोर्टात सुरु आहे. या सुनावणीदरम्यान अर्जुन शिवानी म्हणजेच या केसमधील महत्त्वाच्या साक्षीदाराला कोर्टासमोर उभं करतो.

शिवानीने याआधी मधुभाऊविरोधात चुकीची साक्ष दिली होती. मात्र, आता ती कोर्टासमोर सगळं खरं बोलताना दिसत आहे. प्रोमोत कोर्टात अर्जुन शिवानीला विचारतो की, जे काही झालं आहे ते सर्व खरं कोर्टात सांगा. त्यानंतर शिवानी सगळं खरं कोर्टात सांगते. शिवानी म्हणते, याआधी साक्षीमॅडमच्या बाजूने दिलेली साक्ष खोटी होती. त्यांनी मला खोटी साक्ष देण्यासाठी पैसे दिले होते.

शिवानीची साक्ष ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो की, याचाच अर्थ साक्षी शिखरेनेच विलासचा खून केला आहे याची शक्यता नाकारता येत नाही. हे वाक्य ऐकताच साक्षीला मोठा धक्का बसतो.

साक्षीविरोधात पुरावे गोळा करण्यासाठी चैतन्यने अर्जुन -सायलीला मदत केली आहे. त्यामुळे आता या केसचा निर्णय कोणाविरोधात लागणार हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे. मालिकेत आता साक्षीला तुरुंगवास होणार का? मधुभाऊ सुटणार का? सायली- अर्जुनच्या नात्याचं पुढे काय होणार? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडलेले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : मी आपल्या दरबारात न्याय मागण्यासाठी आलोय; उद्धव ठाकरेंची जनतेला भावनिक आवाहन | Marathi News

Sanjay Raut : शेकाप ही भाजपची 'बी' टीम; संजय राऊत यांची शेकाप उमेदवार टीका

Pune News: पुण्यामध्ये मतदानाच्या दिवशी PMPMLच्या वाहतुकीमध्ये बदल, असा कराल प्रवास

Maharashtra News Live Updates: सांगोल्यातील अपक्ष उमेदवारावर पाठिंब्यासाठी दबाव; निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार

Pune Crime : कपड्याच्या दुकानातून पावणे चार लाखांची रोकड लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

SCROLL FOR NEXT