Chhaya Kadam: 'तुम्ही अंगणात असल्यासारख्या नाचत होत्या...'; छाया कदमकडून ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर, म्हणाली...

Chhaya Kadam Trolled: काही दिवसांपूर्वी कान्स फिल्म फेस्टिवल २०२४ सोहळा पार पडला. या सोहळ्यात छाया कदम यांच्या 'ऑल वी इमेजिन अँज लाईट' या चित्रपटाला पुरस्कार मिळाला. यावेळी रेड कार्पेटवर छाया कदम यांनी डान्स केला होता.
Chhaya Kadam
Chhaya KadamSaam Tv

काही दिवसांपूर्वी कान्स फिल्म फेस्टिवल २०२४ सोहळा पार पडला. या फेस्टिव्हलमध्ये हॉलिवूड, बॉलिवूडसह अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएनसरने उपस्थिती लावली होती. यामध्ये मराठमोळी अभिनेत्री छाया कदम यांनीही हजेरी लावली होती. यावेळी छाया कदम यांनी केलेल्या हटके लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. त्याचसोबच छाया कदम आणि ऑल वी इमेजिन अँज लाईटच्या टीमने रेट कार्पेटवर डान्सदेखील केला होता. यामुळे त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत होतं. यावर आता छाया कदम यांनी नेटकऱ्यांना उत्तर दिले आहे.

छाया कदम यांनी 'ऑल वी इमेजिन अँज लाईट' या चित्रपटाचं स्क्रिनिंग करण्यात आलं होतं. या चित्रपटाला ८ मिनिटं स्टॅडिंग ओव्हिशनदेखील मिळालं होतं. छाया कदम आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं देशभरात कौतुक होत आहे. यावेळी कान्समध्ये रेट कार्पेटवर छाया कदम यांनी डान्स केला होता. यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत होतं. या ट्रोलिंगला छाया कदम यांनी उत्तर दिले आहे.

छाया कदम यांनी एक मुलाखतीत सांगितले की, 'रेट कार्पेटवर डान्स करण्याची आयडिया कोणाची होती हे मी नक्की सांगू शकत नाही. परंतु ती व्यक्ती कदाचित मीच होते. मी डान्स करण्यास सुरुवात केली असावी. मी डान्स केल्यामुळे मला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. सोशल मीडियावर एकाने म्हटले होते की, तुमच्या घराच्या अंगणात असल्यासारखा नाचत होत्या'. त्यावर छाया कदम यांनी उत्तर दिले आहे की, '३० वर्षानंतर एका मोठ्या स्पर्धेचा भाग होणे, पुरस्कार जिंकणे ही माझ्यासाठी खूप मोठी कामगिती आहे. यावेळी नियमांचे पालन का करायचं? आम्ही मनसोक्त डान्स करुन आनंद व्यक्त केला', असंही छाया कदम म्हणाल्या.

Chhaya Kadam
Hardik-Natasha Divorce: हार्दिक-नताशा घटस्फोटाच्या चर्चेत नवा ट्विस्ट; नताशाला मिळणार 70 % प्रॉपर्टी?

छाया कदम यांची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु आहे. 'ऑल वी अमेजिन अँड लाईट' या चित्रपटात छाया कदम यांच्यासोबत कनी कृसृती, दिव्या प्रभा, हृदू, हॅरॉन हे कलाकार आहे. छाया कदम यांनी मराठीसह हिंदी चित्रपट, वेबसीरीजमध्ये काम केले आहे.

Chhaya Kadam
Nakalat Sare Ghadale : ‘नकळत सारे घडले’ येणार नव्या रुपात, लवकरच पार पडणार प्रयोग

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com