KKR Viral Video: लुट पुट गया...KKR च्या विजयानंतर आंद्रे रसेलचा अनन्या पांडेसोबत भन्नाट डान्स- पाहा Video

Andre Russell Dance With Ananya Pandey: कोलकाता नाईट रायडर्स संघाने तिसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरल्यानंतर जोरदार जल्लोष केला आहे.
KKR Viral Video: लुट पुट गया...KKR च्या विजयानंतर आंद्रे रसेलचा अनन्या पांडेसोबत भन्नाट डान्स- पाहा Video
andre russell dance with ananya pandey twitter
Published On

कोलकाता नाईट रायडर्सने शानदार कामगिरी केली आणि आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. हे कोलकाता नाईट रायडर्स संघाचं तिसरं जेतेपद ठरलं आहे. या विजयानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यात जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं आहे. दरम्यान संघातील खेळाडू, सपोर्ट स्टाफमधील सदलस्यांनी क्लबमध्ये जोरदार पार्टी केली. या पार्टीमध्ये बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेने देखील हजेरी लावली होती. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघातील खेळाडू आणि अनन्या पांडे भन्नाट डान्स करताना दिसून येत आहेत. कोलकाता नाईट रायडर्स संघातील खेळाडू आणि अनन्या पांडेसह हेड कोच चंद्रकांत पंडीत देखील डान्स करताना दिसून येत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. तिच्या या हटके डान्समुळे ती सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंगला आहे.

KKR Viral Video: लुट पुट गया...KKR च्या विजयानंतर आंद्रे रसेलचा अनन्या पांडेसोबत भन्नाट डान्स- पाहा Video
T20 World Cup 2024: IPL संपली आता रंगणार टी-२० वर्ल्डकपचा थरार! केव्हा होणार टीम इंडियाचे सामने?

कोलकाता नाईट रायडर्स संघाचा विजय

चेन्नईतील एमए चिंदबरम स्टेडियमवर झालेल्या फायनलच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. कोलकाता नाईट रायडर्स संघाने चौथ्यांदा फायनल गाठली. तर सनरायझर्स हैदराबादने तिसऱ्यांदा फयनलमध्ये प्रवेश केला होता.

KKR Viral Video: लुट पुट गया...KKR च्या विजयानंतर आंद्रे रसेलचा अनन्या पांडेसोबत भन्नाट डान्स- पाहा Video
KKR vs SRH, IPL 2024 Final: दोघांनी एकमेकांना उचललं, मिठी मारली; गौतम गंभीर- सुनील नरेनचा Video बघाच!

या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा हा निर्णय पूर्णपणे फसला. कारण प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद संघाचा डाव अवघ्या ११३ धावांवर आटोपला. कोलकाता नाईट रायडर्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी ११४ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सने ८ गडी राखून आव्हान पूर्ण केलं. यासह तिसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com