KKR vs SRH, IPL 2024 Final: दोघांनी एकमेकांना उचललं, मिठी मारली; गौतम गंभीर- सुनील नरेनचा Video बघाच!

Sunil narine- Gautam Gambhir Viral Video: या सामन्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मेटाँर गौतम गंभीर आणि संघातील अष्टपेैलू खेळाडू सुनील नरेनचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
KKR vs SRH, IPL 2024 Final: दोघांनी एकमेकांना उचललं, मिठी मारली; गौतम गंभीर- सुनील नरेनचा Video बघाच!
sunil narine and gautam gambhir hugged each othertwitter

आयपीएल २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने शानदार कामगिरी केली. या सामन्यात कोलकाताने हैदराबादवर ८ गडी राखून विजय मिळवला आहे. कोलकाताने २०१२ आणि २०१४ मध्ये जेतेपदाला गवसणी घातली होती. आता हैदराबादला धूळ चारत कोलकाताने तिसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी घातली आहे. या विजयानंतर गौतम गंभीरचा आनंद गगनात मावेनासा झाला. सामन्यानंतर त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कोलकाता नाईट रायडर्सकडून वेंकटेश अय्यरने विनिंग रन मारला आणि संघातील सर्वच खेळाडूंनी मैदानाच्या दिशेने धाव घेतली. गंभीर देखील धावत मैदानात गेला. कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या विजयाचा जल्लोष साजरा करताना सुनील नरेनने मेटाँर गौतम गंभीरला उचलून घेतलं. त्यानंतर गंभीरनेही सुनील नरेनला उचललं. दोघेही विजयाचा जल्लोष साजरा करताना दिसून आले.

KKR vs SRH, IPL 2024 Final: दोघांनी एकमेकांना उचललं, मिठी मारली; गौतम गंभीर- सुनील नरेनचा Video बघाच!
KKR vs SRH, IPL Final 2024: KKR च्या विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये जल्लोष! खेळाडूंच्या डान्सचा व्हिडिओ तुफान व्हायरल

नेहमी गंभीर असलेल्या गौतम गंभीरच्या चेहऱ्यावर हसू फुललं. तर सुनील नरेन देखील विजयाचा जल्लोष साजरा करताना दिसून आला. याआधी सहाव्या सातव्या क्रमांकावर फलंदाजीला जाणारा सुनील नरेन सलामीला फलंदाजी करताना दिसून आला. याचं पूर्ण श्रेय गौतम गंभीरला जातं. सुनील नरेनने १४ सामन्यांमध्ये ४८८ धावा केल्या. यासह गोलंदाजी करताना त्याने १७ गडी देखील बाद केले. या दमदार खेळीच्या बळावर त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

KKR vs SRH, IPL 2024 Final: दोघांनी एकमेकांना उचललं, मिठी मारली; गौतम गंभीर- सुनील नरेनचा Video बघाच!
IPL 2024 Prize Money: विराटला ऑरेंज तर हर्षल पटेलला पर्पल कॅप; पाहा पुरस्कार विजेत्या खेळाडूंची संपूर्ण यादी

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादचा डाव अवघ्या ११३ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने एकतर्फी विजय मिळवला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com