Nakalat Sare Ghadale : ‘नकळत सारे घडले’ येणार नव्या रुपात, लवकरच पार पडणार प्रयोग

Nakalat Sare Ghadale Drama : ‘नकळत सारे घडले’ हे नाटक मराठी रंगभूमीवर नव्या अंदाजामध्ये रिलीज होणार आहे.
Nakalat Sare Ghadale : ‘नकळत सारे घडले’ येणार नव्या रुपात, लवकरच पार पडणार प्रयोग
Nakalat Sare Ghadale DramaSaam Tv

प्रेक्षकांचे मनोरंजनाचे साधन दिवसेंदिवस बदलत चालले आहे. सर्वाधिक सिनेरसिकांचा कल चित्रपट, वेबसीरीज आणि वेब फिल्म पाहण्याकडे जास्त आहे. पण असं असलं तरीही मराठी रंगभूमीवरील नाटकांनाही प्रेक्षक तितकाच प्रतिसाद देत आहे. सध्या मराठी रंगभूमीवर अनेक वेगवेगळ्या धाटणीचे नाटक रिलीज होताना दिसत आहे. येत्या १ जूनला एक जुनं नाटक नव्या अंदाजामध्ये रिलीज होणार आहे. ‘नकळत सारे घडले’ असं नाटकाचं नाव असून हे नाटक नव्या अंदाजामध्ये रिलीज होणार आहे.

Nakalat Sare Ghadale : ‘नकळत सारे घडले’ येणार नव्या रुपात, लवकरच पार पडणार प्रयोग
Alyad Palyad Trailer : फिल्टर पाड्याच्या बच्चनच्या ‘अल्याड पल्याड'चा ट्रेलर रिलीज

‘नकळत सारे घडले’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आता नव्या रुपात येत आहे. शेखर ढवळीकर लिखित, विजय केंकरे दिग्दर्शित, राहुल पेठे आणि नितीन भालचंद्र नाईक निर्मित ‘नकळत सारे घडले’ हे नाटक येत्या १ जूनला रंगभूमीवर प्रदर्शित होणार आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग १ जूनला दाखल होणार आहे. नाटकामध्ये प्रमुख भूमिकेत अभिनेते आनंद इंगळे आणि अभिनेत्री डॉ.श्वेता पेंडसे आहे. या दोघांसोबत प्रशांत केणी, तनिषा वर्दे आदी कलाकारांच्या भूमिका या नाटकात आहेत.

Nakalat Sare Ghadale : ‘नकळत सारे घडले’ येणार नव्या रुपात, लवकरच पार पडणार प्रयोग
Hum Do Hamare Baarah : 'हम २ हमारे १२'च्या टीमला अज्ञातांकडून धमकीचा फोन, टीमकडून सुरक्षेची मागणी

प्रत्येक पिढीचं एक मत असतं, एक दृष्टिकोन असतो. कोण बरोबर? कोण चूक? पिढ्यांमधल्या वाढलेल्या अंतराचा हा तिढा सोडवायचा तरी कसा? यावर भाष्य करत ‘नकळत सारे घडले’ मनोरंजक नाट्य आपल्या प्रत्येकालाच स्वतःकडे - विविध नाते संबंधांकडे आणि एकूणच आपल्या मूल्यव्यवस्थेकडे पहायची एक निराळी दृष्टी देते. ‘नकळत सारे घडले’ नाटकाचे संगीत अशोक पत्की यांचे आहे. नेपथ्य राजन भिसे यांचे तर प्रकाशयोजना शितल तळपदे यांची आहे. वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे.

Nakalat Sare Ghadale : ‘नकळत सारे घडले’ येणार नव्या रुपात, लवकरच पार पडणार प्रयोग
'वाका वाका' फेम गायिका इटलीत Anant - Radhika 2nd Pre Wedding गाजवणार, शकिराची संपत्ती पाहून डोळे फिरतील

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com