Tharala Tar Mag SAAM TV
मनोरंजन बातम्या

Tharala Tar Mag : 'ठरलं तर मग'मध्ये मोठा ट्विस्ट; सायलीच तन्वी असल्याचं सत्य मधुभाऊंना समजलं? पाहा VIDEO

Tharala Tar Mag Update: 'ठरलं तर मग' मालिकेत नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. लवकरच सायलीच तन्वी असल्याचे सत्य सर्वांसमोर येणार आहे.

Shreya Maskar

'ठरलं तर मग' मालिकेत विलास खून प्रकरणाचा निकाल लागला आहे.

वात्सल्य आश्रम पुन्हा उघडला आहे.

मधुभाऊंना सायलीच तन्वी असल्याचे सत्य लवकरच समजणार आहे.

प्रेक्षकांची आवडती मालिका 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) प्रेक्षकांचे बंपर मनोरंजन करत आहे. नुकताच विलास खून प्रकरणाचा निकाल लागला आहे. अर्जुन केस जिंकल्यामुळे मधुभाऊ निर्दोष असल्याचे समोर आले आहे. प्रियाला जन्मठेप तर साक्षीला तब्बल सात वर्षांच्या शिक्षा मिळाली आहे. सुभेदार कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आता मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. नुकताच मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे.

'ठरलं तर मग'च्या नवीन प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, वात्सल्य आश्रम पुन्हा उघडला असून पूर्णा आजी सायलीची माफी मागताना दिसत आहे. पूर्णा आजी म्हणते की, "आतापर्यंत तुला आम्ही खूप चुकीचे समजलो...त्याबद्दल सॉरी... " पूर्णा आजी कान पकडून सायलीची माफी मागते. तेव्हा सायली म्हणते की, "पण एका अटीवर आयुष्यभर माझ्या हातचा जेवावं लागेल..." हे ऐकून सर्वजण हसू लागतात. तसेच पूर्णा आजी सायलीला घट्ट मिठी मारते.

दुसरीकडे प्रतिमा आश्रमातील भिंतींवर काढलेले चित्र पाहून रवीराजला म्हणते की, "तन्वी लहानपणी हे असेच चित्र काढायची... " हे सर्व लांब उभे राहिलेले मधुभाऊ ऐकतात. त्यानंतर ते सायलीच्या बालपणाची चित्रकलेची वही पाहतात. त्या वहीतील चित्र देखील भिंतींवरील चित्रासारखे असते. तेव्हा मधुभाऊंच्या मनात शंका येते की सायली हीच तन्वी आहे.

आता लवकरच मालिकेत तन्वी- सायलीचे कोडे देखील सुटणार असल्याचे चित्र दिसत आहे. सायली हीच तन्वी आहे हे सत्य समोर आल्यावर मालिकेत नवीन कोणते वादळ येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'ठरलं तर मग' मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर संध्याकाळी 8:30 वाजता पाहायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गडचिरोली जिल्ह्यात भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू

Mhada 2025 : म्हाडाकडून मुंबईतील १४९ अनिवासी गाळ्यांचा ई-लिलाव; कुठे नोंदणी अन् अर्ज कराल? जाणून घ्या

Kapil Sharma: रिंग ऐकली नाहीतर पुढचा हल्ला मुंबईत; कॅफेवरील गोळीबारनंतर कपिल शर्माला धमकी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना लवकरच २,१०० रुपये मिळणार, महायुतीतील मंत्र्याचं मोठं विधान

Maharashtra Politics: युतीसाठी आम्ही सक्षम, उद्धव ठाकरे गरजले, युतीबाबत इंडियाच्या अटी-शर्ती नाहीत'

SCROLL FOR NEXT