Tharala Tar Mag : सायली-अर्जुनच्या आयुष्यात नवं वादळ; नागराजने प्रतिमाला आगीत ढकलले? पाहा VIDEO

Tharala Tar Mag Update : 'ठरलं तर मग' मालिकेत आता एक धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे. नागराज पुन्हा एकदा प्रतिमाचा जीव घेण्याचा प्रयत्न करणार आहे. मालिकेत नेमकं काय घडणार जाणून घेऊयात.
Tharala Tar Mag Update
Tharala Tar Mag SAAM TV
Published On

'ठरलं तर मग ' (Tharala Tar Mag) मालिका सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या मालिकेत रोज एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. मालिकेच्या सुरुवातीपासून आपण पाहत आहोत की, नागाराज प्रतिमाचा जीव घेण्याचा प्रयत्न करत आहे. अजूनही प्रतिमा आधीच्या धक्क्यातून सावरली नसताना नागाराज पुन्हा तिला मारण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण नागाराजला भीती वाटत आहे की, जर प्रतिमाची स्मृती परत आली तर आपली कटकारस्थान ती सर्वांना सांगेल.

'ठरलं तर मग ' मालिकेचा नुकताच एक प्रोमो समोर आला आहे. हा प्रोमो 'सिरीयल जत्रा'ने शेअर केला आहे. प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, नागराज प्रतिमाला आगीत टाकण्याचा प्रयत्न करत आहे. नागराज घराबाहेर शेकोटी पेटवून प्रतिमाला घाबरवताना दिसत आहे. प्रतिमा देखील आग पाहून प्रचंड घाबरली आहे. कारण आधी झालेल्या अपघातामुळे तिच्या मनात आगीची भीती कायम आहे. नागाराज प्रतिमाला म्हणतो की,"हे बघ मी आगच लावून टाकली, आगीत सगळं नष्ट होणार...आग लागली आग, सगळे जळतील आगीत..."

प्रोमोच्या शेवटी नागराज प्रतिमाला आगीत धक्का देताना दिसत आहे. मात्र ती आगीत पडते की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. येणाऱ्या भागांमध्ये याचा खुलासा होईल. तसेच प्रोमोमध्ये सायली-अर्जुन घराबाहेर फिरत असताना त्यांना रविराजचा फोन येतो आणि अर्जुनला मोठा धक्का बसतो. रविराज नेमकं फोनवर काय सांगतो? प्रतिमाला नेमकं काय झालं? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

'ठरलं तर मग ' मालिका स्टार प्रवाहवर संध्याकाळी 8:30 वाजता पाहायला मिळते.

Tharala Tar Mag Update
Kuberaa : 'कुबेरा' पाहत असताना घडली भयंकर घटना; अचानक थिएटरचं छत कोसळलं, पाहा व्हायरल VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com