Shweta Tripathi : बॉलिवूड अभिनेत्रीनं चेंबूरमध्ये घेतलं घर, किंमत वाचून थक्क व्हाल

Shweta Tripathi Buy New House : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने मुंबईत चेंबूर येथे आलिशान घर घतले आहे. तिच्या घराची किंमत जाणून घेऊयात.
Shweta Tripathi Buy New House
Shweta TripathiSAAM TV
Published On
Summary

बॉलिवूड अभिनेत्रीने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.

अभिनेत्री श्वेता त्रिपाठीने चेंबूर येथे आलिशान घर खरेदी केले आहे.

मुंबईतील श्वेताच्या लग्जरी अपार्टमेंटची किंमत कोटींच्या घरात आहे.

बॉलिवूड अभिनेत्रीने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. अभिनेत्रीने आलिशान नुकतेच आलिशान घर खरेदी केले आहे. ही अभिनेत्री म्हणजे 'मिर्झापूर'ची (Mirzapur ) क्वीन श्वेता त्रिपाठी (Shweta Tripathi) आहे. श्वेता त्रिपाठीला 'मिर्झापूर' या सीरिजमधून खूप लोकप्रियता मिळाली आहे. तिने आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.

श्वेता त्रिपाठीच्या घराची किंमत किती ?

मीडिया रिपोर्टनुसार, श्वेता त्रिपाठीने मुंबईत चेंबूर येथे आलिशान घर खरेदी केले आहे. तिने तब्बल 3 कोटींचा 3 बीएचके फ्लॅट खरेदी केला आहे. नवीन अपार्टमेंट 938 चौरस फूटचे आहे. हे अपार्टमेंट सुप्रीम बुलेवार्डच्या 9 व्या मजल्यावर आहे. घराची अधिकृत नोंदणी 2 जुलै रोजी करण्यात आली.

श्वेता त्रिपाठीने 15 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि 30,000 रुपये नोंदणी शुल्क भरले असल्याची माहिती समोर आली आहे. श्वेता त्रिपाठीला महाराष्ट्र सरकारने महिलांच्या घराच्या मालकीला प्रोत्साहन देण्यासाठी दिलेल्या स्टॅम्प ड्युटी सूटचा लाभ मिळाला आहे. या करारांतर्गत तिला दोन पार्किंग लॉट मिळाले आहेत.

वर्कफ्रंट

ओटीटीवरील 'मिर्झापूर' ही वेब सीरिज खूप गाजली. यामुळे सीरिज मधील कलाकारांना देखील एक ओळख मिळाली आहे. या सीरिजमध्ये गोलूची (गजगामिनी गुप्ता) भूमिकेत श्वेता त्रिपाठी झळकली आहे. सीरिजमधील तिचा अभिनय चाहत्यांना खूप आवडला आहे. 2015 साली रिलीज झालेल्या 'मसान' चित्रपटात श्वेता त्रिपाठीने बॉलिवूडचा सुपरस्टार विकी कौशलसोबत काम केले आहे.

Shweta Tripathi Buy New House
Maharashtra State Film Awards : काजोल ते महेश मांजरेकर; कोणाला कोणता पुरस्कार मिळाला? वाचा सविस्तर यादी
Q

श्वेता त्रिपाठी कोणत्या सीरिजमधून लोकप्रियता मिळाली?

A

मिर्झापूर वेब सीरिज

Q

श्वेता त्रिपाठी कुठे घर घेतले ?

A

मुंबईत-चेंबूर

Q

श्वेता त्रिपाठीच्या नवीन घराची किंमत किती?

A

3 कोटी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com