Viral Video: घर घेण्यासाठी मुलीची अनोखी शक्कल! एकाचवेळी केले २० मुलांना डेट अन् घेतले २० आयफोन, पुढे नक्की काय घडलं? Video

चिनी मुलीने 20 बॉयफ्रेंडकडून आयफोन गिफ्ट घेतले, ते विकून जवळपास 15 लाख रुपये मिळवले आणि अखेर स्वत:चं स्वप्नातील घर खरेदी केलं. ही कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
Viral Video
Chinese Girl ScamSaam Tv
Published On

घर घेण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. यासाठी अनेकजण अहोरात्र मेहनत करतात. एक एक पैसा कमावून अनेकजण घराचे स्वप्न पूर्ण करतात. मात्र आजही असे काही लोक आहेत जे फसवणुकीतून देखील स्वत:चे स्वप्न पूर्ण करताना दिसत आहे. सोशल मीडियावर असाच एक चिनी मुलीचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये या चिनी मुलीने जे डोकं लावलं आहे. ज्याचा तुम्ही कधीच विचार देखील केला नसेल. नेमकं या चिनी मुलीने काय केलं आहे? हे संपूर्ण प्रकरण समजून घ्या.

Viral Video
Car Stunt Viral Video: धावत्या कारमध्ये तरूणाईची जिवघेणी स्टंटबाजी; पुणे बंगळुरू हायवेवर नेमकं काय घडलं? Video

चिनमधील एका गरीब घरातील मुलीचं स्वत:च घर घेण्याचं स्वप्न होतं. मात्र तिच्याकडे घर घेण्यासाठी पैसे नव्हते. पैसे जमवण्यासाठी तिला प्रचंड मेहनत करावी लागणार होती. अशावेळी या चिनी मुलीने एक अनोखी शक्कल लढवली तिने एक-दोन नव्हे तर तब्बल 20 जणांना आपलं बॉयफ्रेंड केलं आहे. आणि त्यांची लाखो रूपयांची फसवणूक करत त्यांना गंडवलं आहे.

जियाओली असं या गरीब कुटुंबातील चिनी मुलीचं नाव आहे. घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जियाओलीने एक दोन नाही तर 20 जणांना तिचा बॉयफ्रेंड केलं आहे. प्रत्येक बॉयफ्रेंडकडून तिने आयफोन गिफ्ट घेतलं आहे. बॉयफ्रेंडने देखील जियाओलीची गिफ्टची इच्छा पूर्ण केली आहे. यानंतर जियाओलीने बॉयफ्रेंडनी दिलेल्या आयफोनचं जे केलं आहे. त्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

Viral Video
Navi Mumbai : नवी मुंबईमध्ये किळसवाणा प्रकार, मॉलमध्ये उंदीर खातायेत आईस्क्रीम; Video Viral

जियाओलीने बॉयफ्रेंडकडून घेतलेले 20 आयफोन 17,815 डॉलर म्हणजे 14 लाख 87 हजार 93 रूपयांना विकले आहेत आणि तिने ते पैसे तिने घर खरेदीसाठी वापरले आहेत. सोशल मीडियावर जियाओलीने केलेल्या फसवणूकीची चर्चा होत आहे. सोशल मिडिया @tech_grammm इन्स्टाग्राम या अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगासारखा व्हायरल होतो आहे. या व्हिडीओला कोटींमध्ये लाईक्स येत असून शेकडो नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com