Navi Mumbai : नवी मुंबईमध्ये किळसवाणा प्रकार, मॉलमध्ये उंदीर खातायेत आईस्क्रीम; Video Viral

Navi Mumbai News : नवी मुंबईतील एका मॉलमधील आईस्क्रीमच्या आउटलेटमध्ये उंदीरांनी धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळत आहे. उंदीर मशीन्सवर बसून आईस्क्रीम खात असल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
Navi Mumbai News
Navi Mumbai Newsx
Published On
Summary
  • नवी मुंबईच्या मॉलमध्ये उंदीरांचा सुळसुळाट

  • आईस्क्रीमच्या दुकानात आढळले उंदीर

  • व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संताप

Video : नवी मुंबईमधून एक किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. नवी मुंबईच्या सीवूड्समधील एका मॉलमधील आईस्क्रीमच्या दुकानामध्ये उंदीरांचा सुळसुळाट झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे म्हटले जात आहे. दुकानात उंदीर मुक्तपणे संचार करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये दुकानातील आईस्क्रीमच्या मशिनवर उंदीर फिरत असल्याचे पाहायला मिळते. दुकानाच्या टेबलावर आईस्क्रीमचा कोन ठेवलेला आहे. टबवर चढून एक उंदीर आईस्क्रीमचा कोन चावत असल्याचे दिसते. नवी मुंबईतील प्रसिद्ध मॉलमध्ये घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. दुकानावर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे.

Navi Mumbai News
BJP : काश्मीर फाईल्ससारखा 'मालेगाव फाईल्स' सिनेमा झाला पाहिजे, भाजप खासदाराची मागणी

न्यूडल्सच्या पाकीटात मेलेली पाल

एका तरुणालाला न्यूडल्सच्या पाकीटामध्ये मेलेली पाल आढळून आली. या प्रकरणी तरुणाने अन्न औषध प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे लेखी तक्रार दिली आहे. पालीचे मेलेले पिल्लू असलेले न्यूडल्सचे पाकीट तरुणाने प्रशासनाच्या स्वाधीन केले. ही घटना अहिल्यानगर शहरात घडल्याची माहिती समोर आली आहे.

Navi Mumbai News
Maharashtra Politics : अजित पवारांच्या नेत्याकडून शरद पवार गटातील नेत्याला जीवे मारण्याची धमकी

निलेश दिवे या तरुणाने अहिल्यानगर शहरामधील डीमार्टमधून न्यूडल्सची दोन पाकीटे खरेदी केली होती. यातील निलेशला एका न्यूडल्सच्या पाकीटात काळपट पदार्थ आढळला. हा काळपट पदार्थ काय आहे हे पाहण्यासाठी पाकिटातील न्यूडल्स एका ताटात टाकले, तेव्हा काळपट पदार्थ हे पालीचे मेलेले पिल्लू आहे हे निलेशच्या लक्षात आले.

Navi Mumbai News
Ind vs Eng : कॅच सुटला की, मॅच? मोहम्मद सिराजची मोठी चूक अन् इंग्लंडला मिळालं जीवनदान, शुभमन गिल भडकला; Video

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com