
भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाची एक प्रमुख योजना
पहिल्या बाळाच्या जन्मावेळी मातेला ५००० रुपये मिळतात.
गर्भवती असल्याची नोंद केल्यानंतर ३ हजार रुपये दिले जातात.
५ हजार रुपये दोन हप्त्यात दिले जातात.
Pradhan Mantri Matru Vandana Yojana: गर्भवती महिलांसाठी केंद्र सरकारच्या विशेष योजनेसाठी एक विशेष मोहीम सुरू आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत, केंद्र सरकार पहिल्या बाळाच्या जन्मावेळी आईला ५००० रुपये देते. जर एखाद्या महिलेने दुसऱ्यावेळी मुलीला जन्म दिला तर त्या मातेला पुन्हा ६००० रुपये मिळतात. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळावा यासाठी दिल्लीत १५ ऑगस्टपर्यंत एक विशेष नोंदणी मोहीम सुरू आहे.
या योजनेअंतर्गत महिला पहिल्यांदा आई झाल्यास तिला ५००० रुपये मिळतात. आधी गर्भवती असल्याची नोंद केल्यानंतर ३ हजार रुपये दिले जातात. दुसरा २ हजार रुपयांचा हप्ता बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याची नोंदणी केल्यास दिला जातो. तर दुसऱ्या गर्भधारणेदरम्यान मुलगी जन्माला आली तर सरकार ६००० रुपये देते. गर्भवती महिलेचे वय किमान १९ वर्षे असावे. याशिवाय कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असावे.
जर एखाद्या महिलेकडे मनरेगा कार्ड असेल किंवा तिला पंतप्रधान किसान सन्मान निधीचा लाभ मिळत असेल, तर ती या योजनेसाठी पात्र आहे. ज्या महिलांकडे ई-श्रम कार्ड किंवा बीपीएल कार्ड आहे किंवा ज्या अपंग आहेत त्या देखील या योजनेसाठी अर्ज करू शकतात. मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३१ जुलै २०२५ पर्यंत, डीबीटी (डायरेक्ट बँक ट्रान्सफर) द्वारे ४.०५ कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या बँक किंवा पोस्ट ऑफिस खात्यांमध्ये १९,०२८ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम हस्तांतरित करण्यात आलीय.
पंतप्रधान मातृ वंदना ही योजना गर्भवती आणि स्तनदा मातांना आर्थिक मदत प्रदान करते. पहिल्या बाळाच्या जन्मासाठी ५००० रुपयांची आर्थिक मदत होते. तर दुसऱ्या बाळंतपणाच्यावेळी मुलगी झाली तर केंद्र सरकार त्या मातेला ६ हजार रुपयांची आर्थिक मदत करते.
जवळच्या अंगणवाडी केंद्राला भेट द्या आणि योजनेची माहिती घ्या.
किंवा अधिकृत PMMVY वेबसाइटला भेट द्या आणि ऑनलाइन अर्ज करा.
pmmvy.nic.in वर जा.
नोंदणी विभाग निवडा: 'pmmvy nic in registration' लिंकवर क्लिक करा.
आधार कार्ड
बँक खात्याची माहिती
मोबाइल नंबर
पात्रता पुरावा,
एमसीपी/आरसीएचआय कार्ड,
एलएमपी तारीख,
एएनसी तारीख,
मुलाचा जन्म दाखला,
मुलाच्या लसीकरणाची माहिती इ.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.