Pushpa 2 The Rule Teaser Instagram
मनोरंजन बातम्या

अल्लू अर्जूनकडून वाढदिवशी चाहत्यांना मोठं गिफ्ट, Pushpa 2 The Rule चा ॲक्शनबाज टीझर प्रदर्शित

Pushpa 2 The Rule: ‘पुष्पा २: द रुल’च्या निर्मात्यांकडून अल्लू अर्जूनच्या वाढदिवशी चित्रपटाचा पहिला वहिला टीझर रिलीज केलेला आहे. अवघ्या काही मिनिटातच टीझरला लाखो व्ह्यूज मिळालेले आहेत.

Chetan Bodke

Pushpa 2 The Rule Teaser

ज्या क्षणाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते, अखेर तो आज क्षण आला. अल्लू अर्जूनच्या बहुप्रतिक्षित ‘पुष्पा २: द रुल’चा टीझर (Pushpa 2 The Rule Teaser) रिलीज झालेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटाबद्दल चाहत्यांना प्रचंड आतुरता होती. अखेर ती प्रतिक्षा संपलेली आहे. नुकतंच निर्मात्यांकडून अल्लू अर्जूनच्या वाढदिवशी (Allu Arjun Birthday) चित्रपटाचा पहिला वहिला टीझर प्रदर्शित करण्यात आलेला आहे. अवघ्या काही मिनिटातच या टीझरला लाखो व्ह्यूज मिळालेले आहेत. (Pushpa 2 The Rule Teaser Out In Instagram)

अल्लू अर्जुन आज ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. आज त्याच्या वाढदिवशी टीझर प्रदर्शित करण्यात आलेला आहे. टीझर रिलीज करण्याआधी अभिनेत्याने पुष्पा स्टाईलमध्ये एक पोस्टर शेअर केला होता. त्यात तो 'पुष्पा'च्या अंदाजात खुर्चीवर बसलेला दिसून आला होता. अल्लू अर्जुनच्या हातात कुऱ्हाड होती आणि 'पुष्पा' स्टाइलमध्ये तो सिंहासनावर बसलेला दिसून आला होता. टीझरबद्दल सांगायचे तर, टीझरमध्ये एकही डायलॉग नाही. फक्त म्युझिक आणि अभिनेत्याच्या ॲक्शनने सर्वांचेच लक्ष वेधलेय.

अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २: द रुल’चा टीझर (Pushpa 2 The Rule Teaser) प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा आहे. पायात घुंगरू, डोळ्यात आग, हातात त्रिशूल आणि अर्धनारीच्या लूकमध्ये 'पुष्पा'च्या ॲक्शन अवताराने सगळ्यांचेच लक्ष वेधलेय. त्यासोबतच अल्लू अर्जून हातात त्रिशूळ आणि शंख घेऊन तांडव करतानाही पाहायला मिळत आहे. निर्मात्यांनी टीझरमध्ये, चित्रपटाच्या रिलीज डेटचीही घोषणा केली आहे. चित्रपट येत्या १५ ऑगस्ट २०२४ ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. टीझरने सर्वांचेच लक्ष वेधले असून चित्रपटाच्या सिक्वेलची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. 'पुष्पा 2'चा टीझर पाहून 'फ्लावर नहीं फायर है' अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. (Tollywood)

‘पुष्पा २’ चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.. ५०० कोटींच्या बजेटमध्ये चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. भारतातील बिग बजेट चित्रपटांमध्ये ‘पुष्पा २’चा समावेश असणार आहे. ‘पुष्पा’प्रमाणेच ‘पुष्पा २’हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड करेल, यामध्ये शंका नाही. अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदानाही स्क्रीन शेअर करणार आहे. तर फहद फासिल खलनायकाच्या भूमिकेत दिसेल. गेल्या काही दिवसांपूर्वी रश्मिका मंदान्नाचा वाढदिवस झाला. तिच्या वाढदिवशी तिचा पहिला कॅरेक्टर पोस्टर प्रदर्शित झाला होता. अल्लू अर्जूनचा ‘पुष्पा २’ आणि अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’ चित्रपट एकाच दिवशी थिएटरमध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP Leader: भाजप नेत्याला घेरत जीवघेणा हल्ला, भररस्त्यात संपवलं; आरोपी घटनास्थळावरुन फरार

Ind Vs Eng 2nd Test : दोन ओव्हर्स, दोन विकेट्स! आकाश दीपचा कहर, इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत

Loofah: प्लास्टिकचा लूफा वापरल्याने त्वचेवर काय परिणाम होतो?

Pune Crime : इंजिनीअरिंगमध्ये तीनवेळा नापास, नैराश्यात तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरुन थेट नदीत उडी

Maharashtra Politics: पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या मारल्या, आणि ही लोक भाषा विचारून हिंदूंना चोपतायत- आशिष शेलार|VIDEO

SCROLL FOR NEXT