Sur Nava Dhyas Nava Season 6 Grand Finale Saam Tv
मनोरंजन बातम्या

धकधक गर्लची धमाकेदार एन्ट्री अन् मकरंद अनासपुरेंचा अफलातून डान्स, ‘सूर नवा ध्यास नवा’ चा Grand Finale होणार रंगतदार

Sur Nava Dhyas Nava Grand Finale: ‘सूर नवा ध्यास नवा’ चा GRAND FINALE बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या धमाकेदार एन्ट्रीमध्ये आणि आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या मकरंद अनासपुरेंच्या डान्सने दिमाखदार अंदाजात सोहळा रंगणार आहे.

Chetan Bodke

Sur Nava Dhyas Nava Season 6 Grand Finale

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो 'सूर नवा ध्यास नवा'चा येत्या ३१ डिसेंबरला ग्रँड फिनाले पार पडणार आहे. आतापर्यंत कार्यक्रमाचे ५ पर्व झाले आहेत. सर्वच पर्वांना प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्याचप्रमाणे सहाव्या पर्वालाही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतोय. येत्या ३१ डिसेंबरला एकूण सहा स्पर्धकांमध्ये हा सोहळा रंगणार आहे. या सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील लाडक्या कलाकारांची उपस्थिती लाभणार आहे. (Serial)

‘सूर नवा ध्यास नवा’ चा GRAND FINALE दिमाखदार अंदाजात साजरा होणार आहे. हा अद्वितीय उत्सव, या पर्वाच्या सर्वोत्तम ६ स्पर्धकांचा कमाल परफॉर्मन्स, भव्य नृत्य प्रदर्शन आणि मराठी सिनेसृष्टीतील प्रतिष्ठित कलाकारांसोबत साजरा होणार आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, कायमच आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे मकरंद अनासपुरे, बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित, आपल्या मधुर आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारी गायिका साधना सरगम यांसारख्या प्रतिष्ठित कलाकारांच्या हजेरीने हा सोहळा आणखीनच रंगणार आहे.

‘सूर नवा ध्यास नवा’ च्या सहाव्या सीझनच्या GRAND FINALE मध्ये एकूण सहा स्पर्धक आहेत. अनिमेष ठाकूर, मृण्मयी भिडे, आदिश तेलंग, अनुष्का शिकतोडे, अंतरा कुलकर्णी आणि गोपाळ गावंडे हे सहा स्पर्धक टॉप ६ मध्ये आहेत.

आता या सहा जणांमधून ‘सूर नवा ध्यास नवा’ च्या सहाव्या सीझनच्या GRAND FINALE ची ट्रॉफी कोण पटकवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सहाव्या सीझनच्या होस्टिंगची धुरा मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री रसिका सुनील करीत आहे.

तर शास्त्रीय गायक महेश काळे आणि प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अवधूत गुप्ते परिक्षक आहेत. ‘सूर नवा ध्यास नवा’ च्या सहाव्या सीझनचा GRAND FINALE सोहळा प्रेक्षकांना येत्या रविवारी अर्थात ३१ डिसेंबरला सायंकाळी ७.०० वा. कलर्स मराठीवर पाहता येणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT