Nana Patekar News: 'वाघनखे आणताय त्याबद्दल अभिनंदन, जमलं तर...' अभिनेते नाना पाटेकर यांचा भाजपवर प्रहार; नेमकं काय म्हणाले?

Nana Patekar On BJP: जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी ट्वीट करत भाजपला टोला लगावला आहे.
Nana Patekar Sudhir Mungantiwar News
Nana Patekar Sudhir Mungantiwar NewsSaamtv
Published On

सुरज मासुरकर, प्रतिनिधी....

Nana Patekar Tweet: छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात आणण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या नोव्हेंबर महिन्यात लंडन येथून त्या आणण्यात येणार आहेत. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे. याच मुद्द्यावरुन जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी ट्वीट करत भाजपला टोला लगावला आहे.

Nana Patekar Sudhir Mungantiwar News
Rain Alert: महाराष्ट्रात पुढील ३ दिवस तुफान पाऊस बरसणार; या जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMDचा अंदाज

याबाबत सविस्तर माहिती अशी की, १ ऑक्टोबर रोजी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) शिवरायांची वाघनखे भारतात आणण्यासाठी लंडनला (London) जाणार आहेत. याबाबतची माहिती स्वतः सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. वाघनखे भारतात आणण्याच्या मुद्द्यावरुन जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला आहे.

नाना पाटेकर यांचे ट्वीट...

"मुनगंटीवार महाराजांची वाघनखे आणताय त्याबद्दल अभिनंदन, जमल तर त्या वाघनखांनी भ्रष्टाचाराचा कोथळा काढता आला तर पहा.." असा टोला नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी ट्वीटमधून लगावला आहे. सध्या नाना पाटेकरांचे हे ट्वीट चांगलेच चर्चेत आले आहे.

Nana Patekar Sudhir Mungantiwar News
Mahavitran च्या सहाय्यक अभियंता रक्तबंबाळ, NCP अजित पवार गटाच्या पदाधिका-यासह भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय शौर्याची साक्ष देणारी ही वाघनखे आहेत. याच वाघनख्यांनी शिवरायांनी अफजल खानाचा वध केला होता. वाघनखाच्या सहायाने महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता. ही वाघनखे भारतात आणून येथील जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com