Rain Alert: महाराष्ट्रात पुढील ३ दिवस तुफान पाऊस बरसणार; या जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMDचा अंदाज

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात येत्या दोन ते तीन दिवसात पावसाचा आणखीच जोर वाढणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Heavy rainfall in Maharashtra for next three days Mumbai Pune Thane Weather Update ssd92
Heavy rainfall in Maharashtra for next three days Mumbai Pune Thane Weather Update ssd92Saam TV
Published On

Maharashtra Weather Forecast: महिनाभराच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार पुनरागमन केलंय. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला असून बळीराजा सुखावला आहे. (Latest Marathi News)

Heavy rainfall in Maharashtra for next three days Mumbai Pune Thane Weather Update ssd92
Maharashtra Politics: शिवसेना १६ आमदार अपात्रतेसंदर्भातील कार्यवाहीला वेग; विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार?

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

दरम्यान, राज्यात येत्या दोन ते तीन दिवसात पावसाचा आणखीच जोर वाढणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, तसेच पालघरमध्ये शुक्रवारी तसेच शनिवारी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. (Breaking Marathi News)

मुंबईसह ठाण्याला यलो अलर्ट

याशिवाय रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदूर्ग जिल्हांना 'येलो' अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत पुढील दोन ते तीन तासांत पावसाचा जोर (Rain Alert) आणखीच वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Heavy rainfall in Maharashtra for next three days Mumbai Pune Thane Weather Update ssd92
IND vs PAK, Asia Cup 2023: भारत-पाकिस्तान सामन्याआधी क्रिडाप्रेमींसाठी गुड न्यूज; डेंजर बॉलरची टीम इंडियात एन्ट्री

हवामान खात्याने मुसळाधार पावसाच्या शक्यतेचा इशारा दिल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच स्थानिक यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काही तास महत्वाचे असणार आहेत.

मराठवाड्यासह विदर्भात धो-धो बरसणार

नाशिकमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू असून गोदावरी नदीला मोठा पूर आला आहे. अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे मराठवाड्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळणार, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com