IND vs PAK, Asia Cup 2023 Match: पाकिस्तानविरुद्धचा साखळी फेरीतील पहिला सामना पावसाने धुतल्यानंतर टीम इंडियाने नेपाळविरुद्धचा सामना जिंकत आशिया कप २०२३ स्पर्धेत सुपर-४ फेरीत एन्ट्री केली. आता टीम इंडियाचा पुढचा सामना पुन्हा पाकिस्तानसोबत होणार आहे. कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर उद्या म्हणजेच १० सप्टेंबर रोजी हा सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार? याकडे क्रिडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. (Latest Marathi News)
दरम्यान, एकीकडे पाकिस्तानने भारताचा टॉप ऑर्डर फलंदाजांना स्वस्तात गुंडाळण्यासाठी मोठा प्लान आखला असताना दुसरीकडे टीम इंडियाने देखील आपली रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियात डेंजर बॉलरची एन्ट्री झाली आहे.
या बॉलरच्या एन्ट्रीमुळे भारतीय फॅन खूश असून पाकिस्तानला धडकी भरली आहे. हा बॉलर दुसरा तिसरा कुणी नसून टीम इंडियाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह आहे. बुमराह नेपाळविरुद्धच्या सामन्याआधी मायदेशी म्हणजेच भारतात परतला होता. आपल्या पहिल्या मुलाच्या जन्मासाठी बुमराह कुटुंबासोबत हजर राहण्यासाठी मायदेशात आला होता.
त्यामुळे तो नेपाळ विरुद्ध खेळला नव्हता. बुमराहच्या जागी नेपाळ विरुद्ध मोहम्मद शमी याला प्लेईंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आली होती. आता तो पुन्हा एकदा टीम इंडियासोबत जोडला गेला आहे. बुमराहच्या एन्ट्रीमुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं आहे. दरम्यान, बुमराह संघात परतल्यानंतर मोहम्मद शमीला पाक विरुद्धच्या सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते.
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा आणि संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर).
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तय्यब ताहिर, सौद शकील, मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ, हरिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह आणि शाहीन आफ्रिदी.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.