Maharashtra Politics: शिवसेना १६ आमदार अपात्रतेसंदर्भातील कार्यवाहीला वेग; विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार?

Shivsena 16 Mla Disqualification Case: विधानसभा अध्यक्ष येत्या आठवड्यात अपात्रतेसंदर्भात कारवाईला सुरुवात करणार असल्याची माहिती साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
Shivsena 16 Mla Disqualification Case Latest Updates Maharashtra Politics
Shivsena 16 Mla Disqualification Case Latest Updates Maharashtra PoliticsSaam Tv
Published On

Shivsena 16 Mla Disqualification Case Latest Updates:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदार अपात्र प्रकरणात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. विधानसभा अध्यक्ष येत्या आठवड्यात अपात्रतेसंदर्भात कारवाईला सुरुवात करणार असल्याची माहिती साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. (Latest Marathi News)

Shivsena 16 Mla Disqualification Case Latest Updates Maharashtra Politics
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत CM शिंदेंचा मोठा निर्णय; 'सह्याद्री’वरील बैठकीनंतर फडणवीसांचं सूचक ट्वीट

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांना अपात्र करा, अशी मागणी ठाकरे गटाने याचिकेतून केली होती. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं आहे. त्यामुळे या प्रकरणाचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहे.

काही दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणात दोन्ही गटातील (शिंदे आणि ठाकरे) आमदारांना लेखी उत्तर सादर करण्याची नोटीस बजावली होती. त्यानंतर शिंदे गटातील आमदारांनी तब्बल ६ हजार पानांचे लेखी उत्तर विधानसभा अध्यक्षांना पाठवले होते. यामध्ये काही पुराव्यांचाही समावेश होता.

Shivsena 16 Mla Disqualification Case Latest Updates Maharashtra Politics
Pune Dam Water Level: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, पाणीपुरवठा करणारी धरणं काठोकाठ भरली, एकूण पाणीसाठा किती?

या उत्तरांची तसेच पुराव्यांची छाननी करण्यात आली असून विधानसभा अध्यक्षांनी पुढील सुनावणीसाठी उद्धव ठाकरे यांच्या गटातील आमदारांसह शिंदे गटातील आमदारांनाही नोटीस पाठण्यास सुरुवात केली आहे. विधिमंडळ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाच्या ४०, तर शिवसेना ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे.

या आमदारांना प्रत्यक्ष विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हजर राहण्यास आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर अपात्रतेच्या कार्यवाहीपासून वाचण्यासाठी या आमदारांना आता युक्तीवाद करावा लागणार आहे. त्यामुळे नेमके कोणत्या गटातील आमदार अपात्र होणार? शिंदे गटातील आमदारांचं काय होणार? याकडेच संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com